अनोळखी व्यक्तीशी मैत्री पडली महागात!

By Admin | Updated: November 25, 2015 02:42 IST2015-11-25T02:42:55+5:302015-11-25T02:42:55+5:30

घरातून पळून येऊन रेल्वेमध्ये एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे एका १७ वर्षीय मुलीच्या आयुष्यावर बेतले.

Celebs fell in love with a stranger! | अनोळखी व्यक्तीशी मैत्री पडली महागात!

अनोळखी व्यक्तीशी मैत्री पडली महागात!

गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबई
घरातून पळून येऊन रेल्वेमध्ये एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे एका १७ वर्षीय मुलीच्या आयुष्यावर बेतले. लोकलमध्ये भेटलेल्या या इसमाने तिला विश्वासात घेत एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी मालाड पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीने बलात्काराची कबुली दिली.
कमलकुमार मोटवानी (३२) असे बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो मूळचा आग्रा येथील बाळकेश्वर कॉलनीतील रहिवासी आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही हैदराबादची राहणारी आहे. घरच्यांना कंटाळून वीस नोव्हेंबर रोजी ती राहत्या घरातून पळाली आणि हैदराबादवरून मुंबईला येणाऱ्या लोकलमध्ये बसली. त्या वेळी तिची ओळख मोटवानीशी झाली. प्रवासादरम्यान झालेल्या गप्पांमधून ही मुलगी घरातून पळून आल्याचे त्याला समजले. त्या वेळी सहानुभूती दाखवत त्याने तिला विश्वासात घेतले.
त्यानंतर तिला घेऊन तो कल्याणमध्ये उतरला आणि एका लॉजमध्ये नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला मालाडमध्ये असलेल्या सोमवार बाजार परिसरात त्याच्या मालकाच्या बहिणीकडे घेऊन गेला आणि या मुलीला नोकरी देण्याची विनंती करत निघून गेला. मालकाच्या बहिणीला जेव्हा ही मुलगी घरातून पळून आल्याचे कळले तेव्हा तिने मालाड पोलीस ठाणे गाठत या मुलीची माहिती दिली. पोलिसांनी या मुलीची चौकशी केली, तेव्हा त्यात मोटवानीने तिच्यावर बलात्कार केल्याचे समजले. त्यानुसार मोटवानीविरोधात बलात्कार आणि अन्य संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि सोमवारी त्याला अटक केली. त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याचे मालाड पोलिसांनी सांगितले.

Web Title: Celebs fell in love with a stranger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.