Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेलिब्रिटीजनी दिला मनोरंजनाचा तडका, राजकीय नेत्यांचीही दही हंडीला उपस्थिती

By संजय घावरे | Updated: September 7, 2023 22:53 IST

मागील काही वर्षांपासून गोपाळकाला आणि सेलिब्रिटीजची हजेरी हे समीकरण गोविंदांचे चांगलेच मनोरंजन करणारे ठरले आहे.

मुंबई - मागील काही वर्षांपासून गोपाळकाला आणि सेलिब्रिटीजची हजेरी हे समीकरण गोविंदांचे चांगलेच मनोरंजन करणारे ठरले आहे. यंदाच्या दहिहंडी उत्सवालाही हिंदी-मराठीतील सेलिब्रिटीजनी मनोरंजनाचा तडका दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय पक्षाचे नेतेही या दहीहंडी उत्सावात दिसून आले. मुंबईतील अनेक नेतेमंडळींचा उत्साहही येथे पाहायला मिळाला. 

हिंदी सिनेसृष्टीतील बड्या सेलिब्रिटीजपासून छोट्या पडद्यावरील कलाकारांनी या उत्सवाचा आनंद लुटत आपल्या शोजसह चित्रपटांचेही प्रमोशन केले. हिंदी कलाकारांमध्ये रकुल प्रीत सिंग, विकी कौशल, अमिषा पटेल, जॅकी भगनानी, भूमी पेडणेकर, पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासह मराठीतील सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, श्रुती मराठे, ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे, गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, नृत्यांगना गौतमी पाटील, प्राजक्ता गायकवाड, विजय पाटकर, रूपाली भोसले यांनी दहिहंडीला हजेरी लावली. छोट्या पडद्यावरील 'ढोलकीच्या तालावर' आणि 'लिटिल चॅम्प्स' या टेलिव्हीजन शोजच्या टिमसह 'दिल दोस्ती दिवानगी' आणि 'अंकुश' या आगामी मराठी चित्रपटांच्या टिमनेही गोविंदांचा उत्साह वाढवला.

टॅग्स :दहीहंडीमुंबईमुख्यमंत्री