कर्जतमध्ये जंगी विजयोत्सव साजरा

By Admin | Updated: October 21, 2014 00:01 IST2014-10-21T00:01:35+5:302014-10-21T00:01:35+5:30

खालापूर मतदार संघामध्ये अनेक पक्षांच्या उमेदवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश लाड यांना चीत-पट करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले

Celebration of victory Vijay Karvats in Karjat | कर्जतमध्ये जंगी विजयोत्सव साजरा

कर्जतमध्ये जंगी विजयोत्सव साजरा

कर्जत : खालापूर मतदार संघामध्ये अनेक पक्षांच्या उमेदवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश लाड यांना चीत-पट करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु लाड यांनी पाच वर्षांतील विकासकामांच्या जोरावर तसेच दांडगा जनसंपर्क आणि कुशल नेतृत्व याच्या जोरावरच मातब्बर उमेदवारांना धूळ चारीत विधानसभेच्या निवडणुकीत तीन हजार मतांनी विजयश्री खेचली.
या भव्य विजयामुळे माथेरानमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोल - ताशांच्या गजरात गावभर भव्य मिरवणूक काढली. यावेळी माजी नगराध्यक्ष अजय सावंत, उपनगराध्यक्ष राजेश दळवी, नगराध्यक्षा दिव्या डोईफोडे, नगरसेवक दिनेश सुतार, गौतम गायकवाड, दिलीप गुप्ता, नगरसेविका हिरावती सकपाळ, उषा पागसे यावेळी उपस्थित होते. माथेरानमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजय सावंत यांनी लाड यांना अधिकाधिक मताधिक्यासाठी पराकाष्टा केली.(वार्ताहर)

Web Title: Celebration of victory Vijay Karvats in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.