मंगलमय वातावरणात वटपौर्णिमा साजरी

By Admin | Updated: June 2, 2015 22:37 IST2015-06-02T22:37:40+5:302015-06-02T22:37:40+5:30

जिल्ह्यात सर्वत्र मंगळवारी मंगलमय वातावरणात वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी सौभाग्यवतींनी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली.

Celebrating Hot Pursuit in a Happy Environment | मंगलमय वातावरणात वटपौर्णिमा साजरी

मंगलमय वातावरणात वटपौर्णिमा साजरी

उरण : जिल्ह्यात सर्वत्र मंगळवारी मंगलमय वातावरणात वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी सौभाग्यवतींनी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली.
उरणमध्ये पहाटे ५.३० वाजल्यापासून माता - भगिनींनी देऊळवाडी येथील शंकर मंदिरासमोर असलेल्या वडाच्या झाडाची पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा केली. यावेळी अनेक नवीन जोडप्यांनीही वडाचे दर्शन घेतले. महिलावर्गात ज्येष्ठांसहित ज्यांचे आता नवीन लग्न झाले आहे त्यांचाही यात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. महिलांनी वडाला वंदन करून त्याच्यापुढे पान, सुपारी, नारळ, फुले, उदबत्ती ठेवून तसेच घरी केलेल्या पुरणपोळी, गोड पदार्थ, फणस, सफरचंद आदि फळांचा नैवेद्य या वटवृक्षाला दाखवला. वटवृक्ष हा भगवान शिवाचा अवतार असल्याने सर्व महिलावर्गाने या वटवृक्षाचे मनोभावे पूजन के ले.
उरणमध्ये अनेक ठिकाणी वडाची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ज्या ठिकाणी वडाची झाडे आहे त्या त्या ठिकाणी महिलांनी पैसा, वेळ इत्यादीची पर्वा न करता भावनिकतेतून वटवृक्ष राजाच्या पूजेला हजेरी लावली. (वार्ताहर)

Web Title: Celebrating Hot Pursuit in a Happy Environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.