Celebrate the birthday by adopting a blind female leopard | अंध मादी बिबट्या दत्तक घेत वाढदिवस साजरा

अंध मादी बिबट्या दत्तक घेत वाढदिवस साजरा

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कोयना या मादी बिबट्याचे पालकत्व स्वीकारत कुवेदांगी बोरीकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे. कुवेदांगी या मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या कन्या आहेत.

९ वर्षीय मादी बिबट्या अंध असून, तिच्या डोळ्यांना दुखापत झाल्याने २०१२ मध्ये तिला कोयना अभयारण्यातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या निवारा केंद्रात दाखल केले होते.  बोरीकर यांनी सलग दुसऱ्यांदा कोयनाला दत्तक घेतले आहे, अशी माहिती राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक व संचालक मल्लिकार्जुन यांनी प्रसार माध्यमांना दिली. उद्यानातील प्राणी एका वर्षाकरिता दत्तक घेण्याची तरतूद असून, वाघ, सिंह व इतर प्राणी अद्याप दत्तक घेण्यासाठी उपलब्ध आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Celebrate the birthday by adopting a blind female leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.