पूर्व मुक्त मार्गावर सीसीटीव्हींची नजर!
By Admin | Updated: July 26, 2014 02:17 IST2014-07-26T02:17:18+5:302014-07-26T02:17:18+5:30
वेगावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या मार्गावर 12 कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

पूर्व मुक्त मार्गावर सीसीटीव्हींची नजर!
मुंबई : पूर्व मुक्त मार्गावर भरधाव वेगाने वाहने चालविणा:या वाहनचालकांना अटकाव करता यावा आणि वेगावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या मार्गावर 12 कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरांत फ्लायओव्हर उभारण्यात येत असून, पूर्व मुक्त मार्गासारखे मोठे प्रकल्पही उभारण्यात आले आहेत. मात्र या मार्गावर भरधाव वेगाने वाहने चालविणा:या वाहनचालकांमुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण मिळविता यावे आणि खबरदारीचा उपाय म्हणून मार्गावरील सुरक्षितता कायम राहावी याकरिता प्रथमत: पूर्व मुक्त मार्गावर कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. शिवाय येथे काही ठिकाणी संरक्षक भिंतही उभारण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलीस व मुंबई महानगरपालिकेच्या वाहतूक विभागाच्या अभियंत्यांनी संयुक्तरीत्या केलेल्या पाहणीनंतर पूर्व मुक्त मार्गावर कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पी.डी. डीमेलो मार्गावरील एस.व्ही. पटेल जंक्शन ते पांजरपोळ या 14 किलोमीटर लांबीच्या पट्टय़ात एकूण 12 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मुक्त मार्ग सिग्नलविरहित आहे. त्यामुळे येथे भरधाव वेगाने वाहने चालविली जातात. परिणामी, अपघात वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय या मार्गाचा वापर आणिक ते पांजरपोळ पट्टय़ातील रहिवासीही करीत आहेत. त्यांची सुरक्षितता डोळ्यांसमोर ठेवून प्राधिकरणाने परिसरातील दोन्ही बाजूंना साडेसहा फूट उंचीची संरक्षक भिंत उभारली आहे. महत्त्वाचे म्हणजे दिशादर्शक व माहितीदर्शक फलकही यापूर्वीच येथे लावण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
च्या कॅमे:यांच्या मदतीने वाहनांचे क्रमांक आणि वेग टिपणो शक्य होणार आहे. या बसवण्यात येणा:या कॅमे:यांचा मुख्य नियंत्रण कक्ष वरळीच्या वाहतूक पोलीस मुख्यालयात असेल.
च्केरळच्या एआरएस ट्रॅफिक अॅण्ड ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी या कंपनीचे अत्याधुनिक कॅमेरे पूर्व मुक्त मार्गावर बसविले जाणार आहेत.