पन्नास महिला डब्यांमध्ये आॅगस्टपासून सीसीटीव्ही
By Admin | Updated: May 10, 2016 02:53 IST2016-05-10T02:53:15+5:302016-05-10T02:53:15+5:30
येत्या काळात आणखी १७ लोकलच्या ५० डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे

पन्नास महिला डब्यांमध्ये आॅगस्टपासून सीसीटीव्ही
मुंबई : सध्या पश्चिम रेल्वेवरील ३ लोकलच्या नऊ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शिवाय, येत्या काळात आणखी १७ लोकलच्या ५० डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पश्चिम रेल्वेकडून एप्रिल महिन्यात निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. जून महिन्यापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आॅगस्ट महिन्यापर्यंत हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी पश्चिम रेल्वेवर पहिली सीसीटीव्ही नियंत्रित लोकल धावली होती. त्यानंतर हे कॅमेरे केवळ काही लोकलच्या महिला डब्यांत लावण्यात आल्याने इतर लोकलच्या महिला डब्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम होता. शिवाय, ग्रॅण्ट रोड आणि अंधेरीजवळ धावत्या लोकलमध्ये महिलांचा विनयभंगाच्या घटना घडल्या, तेव्हादेखील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी महिला प्रवाशांकडून करण्यात आली होती. त्यानंतर पश्चिम रेल्वेने तातडीने पावले उचलली आहेत. (प्रतिनिधी)