तपास सीबीआयकडे सोपवा !
By Admin | Updated: November 29, 2014 01:55 IST2014-11-29T01:55:19+5:302014-11-29T01:55:19+5:30
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व जवखेड हत्याकांडाच्या मुद्दय़ावरून आठवले यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

तपास सीबीआयकडे सोपवा !
मुंबई : राज्य सरकार आणि पोलीस खाते दलितांचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप करून जवखेड खालसा दलित हत्याकांडाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय)विभागाकडे सोपविण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी आज केली.
दलित अत्याचारांविरोधात व इंदू मिलच्या जागेवर डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपाइं कार्यकत्र्यानी आज चैत्यभूमी ते इंदू मिल मार्गावर मोर्चा काढला. या वेळी रिपाइं कार्यकत्र्यानी इंदू मिलमध्ये घुसण्याचा प्रय} केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. दलित अत्याचार रोखण्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी दर 3 महिन्यांनी बैठक घ्यावी, प्रत्येक जिल्ह्यात विशेष पोलीस अधीक्षक नेमावा, इंदू मिल हस्तांतरणाचे विधेयक संसदेत त्वरित मंजूर करावे, अशा विविध मागण्या आठवले यांनी या वेळी केल्या.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व जवखेड हत्याकांडाच्या मुद्दय़ावरून आठवले यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले. संपूर्ण दादर परिसरात निळे ङोंडे लावत वातावरणनिर्मितीही करण्यात आली. या वेळी सरकारविरोधात कार्यकत्र्यानी आक्रमक घोषणाबाजी केली, तेव्हा हा मोर्चा सरकारविरोधी नसल्याचा खुलासा आठवले यांना करावा लागला. (प्रतिनिधी)
तपासासाठी पोलिसांना वेळ द्या -तावडे
राज्य शासनाच्यावतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सभेला उपस्थिती लावली. जवखेड प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना वेळ द्यायला हवा. पोलीस अपयशी ठरले तर राज्य शासन स्वत:हून हा विषय सीबीआयकडे सोपवेल, अशी घोषणा तावडे यांनी या वेळी केली. तर 14 एप्रिलर्पयत इंदू मिल येथील स्मारकाची पायाभरणी करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.
़़़अन् आठवलेंनीही नाचवली रायफल
दलितांचे संरक्षण करण्यास पोलिसांना अपयश आले आहे. स्वसंरक्षणासाठी आता दलितांच्या हाती शस्त्रे द्या, अशी मागणी आठवले यांनी या वेळी केली. खुद्द आठवले यांच्यासह काही आंदोलकांनी पोलिसांदेखत रायफली नाचविल्या़ या वेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.