Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी रेल्वे प्रवासाला महिलांचा सावध प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 09:02 IST

या पार्श्वभूमीवर बुधवारपासून मुभा असल्याने महिलांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. पण सकाळी ११ पूर्वी कामाच्या वेळेत प्रवास करू शकत नसल्याने अनेक महिलांनी सावध प्रतिसाद देत बेस्ट आणि खाजगी वाहनाने प्रवास केला.

मुंबई :महिलांचा रखडलेला लोकल प्रवास बुधवारपासून सुरू करण्यात आला आहे. परंतु नियमित अत्यावश्यक सेवेतील महिलांव्यतिरिक्त इतर महिलांनी सावध प्रतिसाद देत प्रवास केल्याचे चित्र दिसत होते. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी, रेल्वेची नेहमीच तयारी होती. महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार महिलांना लोकल प्रवासासाठी त्वरित परवानगी देत आहोत, अशी घोषणा करीत बुधवारपासून सर्व महिला प्रवाशांना सकाळी ११ ते दु. ३ दरम्यान व सायंकाळी ७ नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली होती.या पार्श्वभूमीवर बुधवारपासून मुभा असल्याने महिलांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. पण सकाळी ११ पूर्वी कामाच्या वेळेत प्रवास करू शकत नसल्याने अनेक महिलांनी सावध प्रतिसाद देत बेस्ट आणि खाजगी वाहनाने प्रवास केला. तर दुपारी कामाला जाऊन संध्याकाळी परत येणाऱ्या आणि सणानिमित्त खरेदीसाठी जाणाऱ्या महिलांनी प्रवास केला.

या वेळा सर्वसामान्य महिलांच्या सोयीच्या नाहीत. केवळ दुपारी कामाला जाणाऱ्या महिलांना फायदेशीर आहे.- सदानंद पावगी, उपाध्यक्ष,रेल्वे प्रवासी संघ 

टॅग्स :लोकलमहिलामुंबईकोरोना वायरस बातम्या