Join us  

Casting Couch : 'अभिनेत्रींनी निर्मात्यांचे गुलाम बनून राहण्याचा सल्लाच सरोज खान देताहेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 1:59 PM

टॉपलेस होणारी अभिनेत्री श्री रेड्डीनं सरोज खान यांच्या वादग्रस्त विधानाविरोधात संताप व्यक्त केला आहे. 

मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी कास्टिंग काऊचबाबत वादग्रस्त विधान केल्यानं 'कास्टिंग काऊच'चा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  ''बाबा आदमच्या काळापासून कास्टिंग काऊचचा प्रकार सुरू आहे. तसेच बॉलिवूड इंडस्ट्री बलात्कार करुन मुलींना सोडून देत नाही तर कामही देते'', असे वादग्रस्त विधान सरोज खान यांनी केले. चित्रपटसृष्टीत होणाऱ्या कास्टिंग काऊच विरोधात आवाज उठवत भर रस्त्यात टॉपलेस होणारी अभिनेत्री श्री रेड्डीनं सरोज खान यांच्या वादग्रस्त विधानाविरोधात संताप व्यक्त केला आहे. 

''सरोज खान यांच्याबाबत आता आदर राहिलेला नाही. वरिष्ठ या नात्यानं सरोज खान यांनी तरुण अभिनेत्रींना योग्य मार्ग दाखवला पाहिजे. त्यांच्या विधानामुळे चुकीचा संदेश दिला जातोय. अभिनेत्रींनी निर्मात्यांचे गुलाम बनून राहिले पाहिले, असा चुकीचा संकेत त्यांनी केलेल्या विधानाद्वारे दिला जातोय'', अशी प्रतिक्रिया श्री रेड्डीनं दिली आहे. 

कास्टिंग काऊचच्या मुद्द्यावरून तेलुगू अभिनेत्री श्री रेड्डीने हैदराबाद येथील तेलुगू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या समोरील रस्त्यावर टॉपलेस होत निषेध नोंदवला. 7 एप्रिलला अर्धनग्न आंदोलन करताना स्थानिक कलाकारांना चित्रपटांत संधी मिळत नसल्याचा आरोप तिनं केला होता.

 

टॅग्स :कास्टिंग काऊचश्री रेड्डीबॉलिवूड