पायधुनी येथे साडे-बारा लाखांची रोकड जप्त

By Admin | Updated: October 1, 2014 00:05 IST2014-10-01T00:05:42+5:302014-10-01T00:05:42+5:30

पायधुनी येथे साडे-बारा लाखांची रोकड जप्त

A cash of Rs. 12 lakh cash in Pydhuni was seized | पायधुनी येथे साडे-बारा लाखांची रोकड जप्त

पायधुनी येथे साडे-बारा लाखांची रोकड जप्त

यधुनी येथे साडे-बारा लाखांची रोकड जप्त
मुंबई: नाकाबंदी दरम्यान पायधुनी पोलिसांनी एका तरुणाकडून साडे-बारा लाखांची रोकड हस्तगत केली आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून या रक्कमेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
निवडणुकीमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप केले जाते. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण राज्यात बंदोबस्त वाढवला आहे. अशाच प्रकारे पायधुनी पोलिसांकडून भेंडी बाजार परिसरात सोमवारी नाकाबंदी लावण्यात आली होती. यावेळी रिझवान कुरेशी हा तरुण टॅक्सीतून संशयास्पद जात असताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांना पाहताच तरुणाने त्याच्या जवळ असलेली बॅग लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्याच्या बॅगेमध्ये पोलिसांना १२ लाख ३४ हजार पाचशे रुपयांची रोकड आढळून आली. या तरुणाकडे पोलिसांनी पैशांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. शिवाय त्याच्याकडे या पैशांबाबत कुठल्याही प्रकारची कागदपत्र नसल्याने पोलिसांनी आयकर विभागाला याची माहिती देऊन त्याला अटक केली आहे. सदर तरूण हा मुळचा उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील राहणारा असून त्याने ही रक्कम कुठून आणली, याबाबत चौकशी सुरु असल्याचे पायधुनी पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: A cash of Rs. 12 lakh cash in Pydhuni was seized