ग्राहकांना फसवणाऱ्या ६१२ जणांवर खटले
By Admin | Updated: September 13, 2016 05:22 IST2016-09-13T05:22:51+5:302016-09-13T05:22:51+5:30
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी वैधमापनशास्त्र यंत्रणेने विशेष मोहीम आखली आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील १ हजार २०१ दुकानांची तपासणी करण्यात आली.

ग्राहकांना फसवणाऱ्या ६१२ जणांवर खटले
मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी वैधमापनशास्त्र यंत्रणेने विशेष मोहीम आखली आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील १ हजार २०१ दुकानांची तपासणी करण्यात आली. छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे, पॅक केलेल्या वस्तूंवर योग्य माहिती नसणे अशा प्रकरणांमध्ये ६१२ खटले दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती वैधमापनशास्त्र यंत्रणेने दिली.
वैधमापनशास्त्र विभागाने ग्राहकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. पॅक्ड वस्तूंवर योग्य माहिती न छापल्याबद्दल ३०५ खटले, छापील किमतीपेक्षा जास्त दराप्रकरणी ५३, छापील किमतीमध्ये खाडाखोड केल्याप्रकरणी १७ आणि कमी वजनाची मिठाई दिल्याप्रकरणी ५३ खटले दाखल करण्यात आले आहेत, तसेच वजनांची फेरपडताळणी व मुद्रांकन न केल्याबद्दल १८४ खटले दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)
इथे करा तक्रार !
ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी मुख्यालयातील नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. ०२२-२२८८६६६६, ई-मेल पत्ता- dclmms_complaints@yahoo.com किंवा dclmms@yahoo.in तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक ९८६९६९१६६६ अथवा फेसबुकवर Legal Metrology Maharashtra Consumer Grievances या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन वैधमापनशास्त्र विभागाने केले आहे.