Join us

ओला कचरा न उचलल्यास सोसायट्यांना दंड, सुक्या कचऱ्यासाठी पालिकेलाच भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 05:00 IST

ओल्या कच-यावर गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातच सक्ती लागू केल्यानंतर आता सुका कचरा उचलण्यासाठी सात ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : ओल्या कच-यावर गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातच सक्ती लागू केल्यानंतर आता सुका कचरा उचलण्यासाठी सात ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्षभर सुका कचरा घराघरांतून उचलण्यासाठी पालिका तब्बल साडेपाच कोटी रुपये खर्च करेल.मुंबईवरील कचºयाचा भार कमी करण्यासाठी पालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या आवारातच ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्याची सक्ती केली आहे़ हा नियम न पाळणाºया सोसायट्यांकडून ओला कचरा उचलण्यासाठी ठरावीक शुल्कही आकारण्यात येईल. मात्र सुका कचरा उचलण्यासाठी पालिकेलाच खर्च करावा लागेल.सुक्या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी ३७ केंद्रे आहेत. जमा केलेला सुका कचरा केंद्रात नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने खासगी टेम्पो भाड्याने घेण्यासाठी हे ठेकेदार नेमले आहेत.>एका वर्षासाठी तब्बल पाच कोटींचे कंत्राटअनेकवेळा सुका कचºयातील काही वस्तूंची विक्री करून कचरावेचक पैसे कमवितात़ मात्र हाच कचरा उचलण्यासाठी मुंबई पालिकेला आपल्या तिजोरीतून खर्च करावा लागेल. २४ प्रभागांमधील सुका कचरा वाहून नेण्यासाठी सात ठेकेदारांची पालिकेने निवड केली असून, या सातही परिमंडळांसाठी एक वर्षासाठी पाच कोटी २७ लाखांचे कंत्राट दिले आहे.