राजेंद्र गावितांवर मीरा-भाईंदर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:25 IST2020-12-12T04:25:43+5:302020-12-12T04:25:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वसई : पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्यावर मीरा-भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तांलय हद्दीतील नयानगर पोलीस ठाण्यात ...

राजेंद्र गावितांवर मीरा-भाईंदर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्यावर मीरा-भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तांलय हद्दीतील नयानगर पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर हे सर्व मला आताच समजले असून, हे माझ्याविरुद्ध षडयंत्र असल्याचे गावित यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मध्यंतरी माझ्या गॅस एजन्सीमध्ये दोन ते तीन जणांनी मिळून कोट्यवधी रुपयांचा गॅसचा काळा बाजार केला होता. त्यात अलीकडच्या काळात रंगेहाथ गॅस सिलिंडरचा ट्रक पकडून माझ्या कार्यालयातील कर्मचारी यात सहभागी होते, असे ही सिद्ध झाले होते. त्यात आरोप करणारी महिलाही होती, परंतु गुन्हा दाखल झाल्यावर अन्य दोघेही अटकेत गेले. मात्र, महिलेने अटकपूर्व जामीन घेतल्याने तिला अटक झाली नाही आणि शेवटी मला यात हेतुपुरस्सर गोवण्याचा प्रयत्न करून, माझ्याविरुद्ध खोटा विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे गावित म्हणाले. संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी याबाबत मला रीतसर काहीही माहितीवजा नोटीस दिली नाही आणि अचानकपणे हा गुन्हा दाखल होतो, हे सर्व संशयास्पद आहे. याबाबत दोषींवर मानहानीचा गुन्हा व संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असेही गावित यांनी सांगितले.