नगरसेविका सुरेखा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:04 IST2020-12-08T04:04:29+5:302020-12-08T04:04:29+5:30
धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप नगरसेविका सुरेखा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...

नगरसेविका सुरेखा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल
धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप
नगरसेविका सुरेखा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल
धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवलीतील प्रभाग क्रमांक २७ मधील भाजपच्या नगरसेविका सुरेखा पाटील यांच्याविरोधात समतानगर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला.
पाटील यांनी ६ डिसेंबर रोजी कांदिवली पश्चिमेकडील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील परिसरात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला अभिवादन केले. मात्र या प्रतिमेवर आक्षेपार्ह खुणा असलेला फोटो फेसबुकवर अपलोड केला हाेता. ताे व्हायरल झाल्यानंतर कांदिवलीतील संतप्त आंबेडकरी अनुयायांसह वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच आंबेडकरी संघटनेने समतानगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. नगरसेविका पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर अनावधानाने काही खुणा दाखवण्यात आल्याबाबत मी तमाम आंबेडकरी समाजाची माफी मागते. इतक्या महान महापुरुषाचा अवमान करण्याचा माझा उद्देश नव्हता आणि अशी चूक भविष्यात माझ्याकडून कधीही होणार नाही, असे सांगत फेसबुकवरून पाटील यांनी सर्वांची माफी मागितली.
.................................