Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरातील दागिन्यांवर कारपेंटरचा डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 06:05 IST

डागडुजीचे काम करीत असलेल्या कारपेंटरनेच घरातील दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना बोरीवलीत घडली.

मुंबई : डागडुजीचे काम करीत असलेल्या कारपेंटरनेच घरातील दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना बोरीवलीत घडली. या प्रकरणी मिश्रा नावाच्या व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोरीवली पश्चिमेकडील परिसरात नैनेश शहा (३४) कुटुंबीयांसोबत राहतात. ते व्यावसायिक आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना घरात डागडुजीचे काम करायचे होते. त्याचदरम्यान एका मिश्रा नावाच्या व्यक्तीने शुक्रवारी त्यांच्याशी संपर्क साधला. घर मे काम करना है क्या? याबाबत विचारणा केली. तेव्हा, शहा यांनी घरातील डागडुजीच्या कामाची जबाबदारी त्याच्यावर सोपविली. शनिवारी तो काम बघून गेला.ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळी तो कामासाठी आला. त्यापूर्वीच शहा कुटुंबीयांनी घरातील दागिने लपवून ठेवले होते. घरात काम सुरू असताना, घरातील मंडळी बाजारात खरेदीसाठी गेली होती. याचदरम्यान मिश्राने घरातील दागिन्यांवर हात साफ केला आणि तो निघून गेला.शहा कुटुंबीय घरात परतल्यानंतर मिश्रा निघून गेला होता. त्यांनी कपाट तपासले असता, घरातील दागिने चोरीस गेले होते. शहा यांनी या प्रकरणी बोरीवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :दरोडा