मानखुर्द- घाटकोपर लिंक रोडवर कारला आग
By Admin | Updated: June 1, 2016 00:25 IST2016-05-31T23:04:01+5:302016-06-01T00:25:04+5:30
मुंबईतील मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर एका गाडीला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. ही घटना रात्री दहाच्या सुमारास घडली.

मानखुर्द- घाटकोपर लिंक रोडवर कारला आग
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.31 - मुंबईतील मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर एका गाडीला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. ही घटना रात्री दहाच्या सुमारास घडली.
मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर एका मारुती ओमनी कारने अचानक पेट घेतला. त्यामुळे काहीवेळ वाहतुकीवर परिणाम झाला. कार रस्त्यात कार जळत असल्याने घाटकोपरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, आगीचे वृत्त कळताच अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्नीशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.