ठाण्याच्या तरु णांनी तयार केले करिअर अ‍ॅप

By Admin | Updated: June 8, 2015 04:03 IST2015-06-08T04:03:29+5:302015-06-08T04:03:29+5:30

दहावी, बारावी वीनंतर काय करायचे? कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा? कोणते करिअर निवडायचे? असे अनेक प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला भेडसावत असतात.

Career app created by Thane youth | ठाण्याच्या तरु णांनी तयार केले करिअर अ‍ॅप

ठाण्याच्या तरु णांनी तयार केले करिअर अ‍ॅप

विजय मांडे, कर्जत
दहावी, बारावी वीनंतर काय करायचे? कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा? कोणते करिअर निवडायचे? असे अनेक प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला भेडसावत असतात. या गोंधळाच्या स्थितीत मग अनुभवी लोकांचे सल्ले, मित्रांशी चर्चा सुरु होते. त्यातूनही योग्य निवड करता येईल की नाही हे सुद्धा कळत नाही.त्यामुळे वेळही जातो आणि डोक्यात गोंधळाचे चक्र फिरू लागते. या गोंधळातून सहज व सोप्या पद्धतीने करिअरची दिशा ठरवता यावी व डोक्याचा ताण कमी व्हावा यासाठी ठाण्यातील दोन युवकांनी ‘९९ पेन्सिल्स’ हे अ‍ॅप तयार केले आहे.
कर्जतच्या प्रकाश बाबुलाल ओसवाल यांचे ठाण्याचे जावई राहुल ओसवाल व त्यांचा मित्र प्रतीक काटे या युवकांनी प्रवेश प्रक्रि येपासून ते करिअरपर्यंतची सर्वच माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी म्हणून ‘९९ पेन्सिल्स’ हे अ‍ॅप तयार केले. शासकीय संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती उपलब्ध असली तरी वेबसाईटवर सर्च करताना अनेक अडचणी येऊ शकतात म्हणून हे अ‍ॅप तयार केल्याचे या दोन युवकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे शासकीय संकेतस्थळावर ही सर्व माहिती उपलब्ध असली तरी या अ‍ॅपमध्ये कटआॅफ लिस्टची माहिती देण्यात आली आहे. जी शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध होत नाही असेही या दोघांनी सांगितले.

असे आहे ‘९९ पेन्सिल्स अ‍ॅप’
च्‘९९ पेन्सिल्स’ मध्ये अ‍ॅडमिशन, कॉलेज लिस्ट, करिअर पाथ व आॅफर्स हे चार मुख्य पर्याय दिले आहेत. त्यात अ‍ॅडमिशन या पहिल्या पर्यायामध्ये प्रवेश प्रक्रि या, कट आॅफ लिस्ट, कॉलेज लिस्ट हे पर्याय देण्यात आले आहेत. त्यातील प्रवेश प्रक्रि येमध्ये कोणत्या शाखेत प्रवेश घेऊ शकता ही माहिती सविस्तर देण्यात आली आहे.
च्कट आॅफच्या यादीत विद्यार्थ्याला किती गुण मिळाले व कोणत्या कॉलेजमध्ये अर्ज दाखल करू शकतो याची माहिती तर कॉलेज लिस्टमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येईल ही माहिती पुरविण्यात आली आहे.

कशी सुचली संकल्पना?
च्दहावी- बारावीच्या निकालाबद्दल सर्वत्र चर्चा सुरु होती. ही चर्चा एकदा ऐकली. मोबाइलवर सर्वच जग दिसतंय. सर्वांच्या हातात स्मार्ट फोन आले आहेत. त्यामुळे करिअरची दिशा ठरविणाऱ्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चटकन माहिती पुरविणारे अ‍ॅप तयार करण्याची संकल्पना सुचली. केवळ पंचवीस दिवसांत हे अ‍ॅप तयार केले असून याचे डाऊनलोड पूर्णत: मोफत आहे.

Web Title: Career app created by Thane youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.