कारचालकाला आली फिट
By Admin | Updated: January 24, 2017 06:14 IST2017-01-24T06:14:43+5:302017-01-24T06:14:43+5:30
कार चालवत असताना चालकाला अचानक फिट आली. हा प्रकार नेमका मालवणी सिग्नलवर रविवारी घडला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

कारचालकाला आली फिट
मुंबई : कार चालवत असताना चालकाला अचानक फिट आली. हा प्रकार नेमका मालवणी सिग्नलवर रविवारी घडला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.
मालवणीत सायंकाळी साडे पाचच्या सुमारास मालवणी सिग्नलवर एक सँट्रो कार अचानक वेडीवाकडी वळणे घेऊ लागली. मुख्य म्हणजे सायंकाळी या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी असते. त्यामुळे ही बाब जशी वाहतूक पोलिसांच्या लक्षात आली तशी त्यांनी घटनास्थळी धाव घेत ही कार थांबवली. त्या वेळी कारमध्ये असलेला चालक एस. अन्सारी याला फिट आल्याने तो बेशुद्ध झाला होता. तसेच त्याच्या तोंडातून रक्त वाहत होते. त्याच्या नाकाला पोलिसांनी कांदा लावत त्याला शुद्धीवर आणले. त्यानंतर त्याची रवानगी शताब्दी रुग्णालयात करण्यात आली. तो मालवणीचाच राहणारा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)