कार चालकाचा अखेर मृत्यू

By Admin | Updated: October 8, 2014 01:31 IST2014-10-08T01:31:26+5:302014-10-08T01:31:26+5:30

सायन-पनवेल महामार्गावर खारघर खाडीत सोमवारी रात्री नऊच्या सुमारास बुडालेली इंडिका कार तब्बल सात तासांनी बाहेर काढली

Car driver's death | कार चालकाचा अखेर मृत्यू

कार चालकाचा अखेर मृत्यू

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर खारघर खाडीत सोमवारी रात्री नऊच्या सुमारास बुडालेली इंडिका कार तब्बल सात तासांनी बाहेर काढली. अपघातामध्ये विश्वनाथन मुरली यांचा मृत्यू झाला असून, दोन महिलांना वाचविण्यात यश आले. भरती व गाळामुळे कार व चालकास शोधण्यास अडचण निर्माण झाली होती. ओहोटी सुरू झाल्यानंतर पहाटे साडेचारच्या दरम्यान कार व विश्वनाथन यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
खारघर सेक्टर १९ मध्ये राहणारे विश्वनाथन मुरली, त्यांची पत्नी मीरा मुरली व मुलगी वैष्णवी यांच्यासह पनवेलवरून घरी जात होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात इंडिकावरील ताबा सुटल्याने कार संरक्षक पत्र्याला धडकून खाडीत पडली. मीरा व वैष्णवी यांनी कारचा दरवाजा उघडून बाहेर उडी मारली, परंतु विश्वनाथन यांना उडी मारण्याची संधी मिळाली नाही. भरती असल्याने कार खाडीत पूर्णपणे बुडाली. पुलावरून जात असताना विकी भोईर या दुचाकीस्वाराने हा प्रकार बघताच त्याने आपली गाडी बाजूला उभी करून कोपरा खाडीपुलावरून थेट पाण्यात उडी मारली व लहान होडीच्या सहाय्याने दोन्ही महिलांना बाहेर काढले. यावेळी घटनेची माहिती मिळताच कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधारी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून त्यांनी दोघींना एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे दाखल करून अपघातग्रस्त गाडीचा शोध सुरू केला. या शोधमोहीमेमध्ये पोलिसांनी त्याठिकाणी एक क्रे न, दोन
हायड्रा मशिन, सागरी दलाची स्पीड बोट बोलावून गाडी बाहेर काढण्याचा शर्तीचा प्रयत्न केला. सात तासानंतर गाडी बाहेर काढली. (प्रतिनिधी)

Web Title: Car driver's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.