कर्नाटक एससीचा जेतेपदावर कब्जा
By Admin | Updated: January 10, 2017 04:05 IST2017-01-10T04:05:35+5:302017-01-10T04:05:35+5:30
पेनल्टी शूटआऊट टायब्रेकमध्ये गेलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात गोलरक्षक गगन शेट्टीने केलेल्या अप्रतिम बचावाच्या जोरावर कर्नाटक

कर्नाटक एससीचा जेतेपदावर कब्जा
मुंबई : पेनल्टी शूटआऊट टायब्रेकमध्ये गेलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात गोलरक्षक गगन शेट्टीने केलेल्या अप्रतिम बचावाच्या जोरावर कर्नाटक स्पोटर््स क्लबने १०व्या कुड्रोली स्मृती फुटबॉल स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले. थरारक झालेल्या अंतिम सामन्यात कर्नाटक स्पोटर््स क्लबने ५-४ अशी बाजी मारत उदया संघाला नमवले.
कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या वतीने क्रॉस मैदानावर झालेल्या या सामन्यात निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊट टायब्रेकमध्ये गगनची कामगिरी निर्णायक ठरली. कर्नाटकने आपल्या पाचही संधी सत्कारणी लावल्या, तर उदया संघ एक गोलने अपयशी ठरला. कॅल्विन परेराने मारलेली किक गगनने रोखन कर्नाटकच्या विजेतेपदावर शिक्का मारला.
तत्पूर्वी, दोन्ही संघांनी बचावावर अधिक भर दिला. २६व्या मिनिटाला उदया संघाला पेनल्टी किकची सुवर्णसंधीही मिळाली होती. मात्र, मोहित गेट्टी गोल करण्यात अपयशी ठरला. यानंतर कर्नाटकने दमदार बचाव करत उदया संघाचे आक्रमण रोखले.
टायब्रेकमध्ये कर्नाटक एससी संघाकडून पेनल्टी शूटआऊट टायब्रेकमध्ये अदनान यलगार, लॉरेन्स बेटगेरी, दिनेश पवार, अक्षय पवार आणि सागर शेट्टी यांनी प्रत्येकी एक गोल केला. तर उपविजेते ठरलेल्या उदया एससीकडून मोहित गेट्टी, आॅलिव्हर कॅस्टेलिनो, मिखाइल रिबेरो आणि जयेश नाईक यांना गोल करण्यात यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)