उमेदवार मतदारांच्या शोधात !
By Admin | Updated: September 29, 2014 05:14 IST2014-09-29T05:14:18+5:302014-09-29T05:14:18+5:30
मित्रपक्षच प्रतिस्पर्धी असल्याने प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उमेदवार कोंडीत सापडल्याचे चित्र आहे़ पारंपरिक विरोधकांवर आरोप करायचे की आतापर्यंत एकाच बाकावर बसणाऱ्या मित्राचे बिंग फोडायचे

उमेदवार मतदारांच्या शोधात !
मुंबई : मित्रपक्षच प्रतिस्पर्धी असल्याने प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उमेदवार कोंडीत सापडल्याचे चित्र आहे़ पारंपरिक विरोधकांवर आरोप करायचे की आतापर्यंत एकाच बाकावर बसणाऱ्या मित्राचे बिंग फोडायचे, अशा धर्मसंकटात उमेदवार अडकले आहेत़ त्यामुळे प्रचाराला कमी दिवस उरले असताना पहिल्या दिवशी पारंपरिक मतदारांचा अंदाज घेण्यास व प्रचार फेऱ्यांची
व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे़
शिवसेना-भाजपा युतीत फूट आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बिघाडी झाल्यामुळे सर्वच मतदारसंघांत पंचरंगी लढत होणार आहे़ शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे असे पाच प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ युतीमुळे उभय पक्षांची हमखास मतं त्या उमेदवाराच्या पारड्यात पडत होती़ मात्र या मतांमध्येच विभागणी होत असल्याने आपला मतदार कोण, याचा नव्याने शोध सुरू झाला आहे़ कोणत्या वॉर्डात आपले मतदार अधिक आहेत, याचा अंदाज यापूर्वीच घेण्यात आला
आहे़
मात्र मित्रपक्ष आता बरोबर नसल्याने त्यांची मतं आपल्याकडे कशी वळविता येतील, यासाठी आज दिवसभर कार्यकर्ते व नेत्यांच्या बैठका सुरू राहिल्या़ रविवारची सुटी व्यूहरचना आखण्यात सत्कारणी लावण्यात आला़
प्रत्येक निवासी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना भेटणे, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणे असे
सुरू होते़ जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला जात
आहे़ (प्रतिनिधी)