मनोहर कुंभेजकर - मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांना ‘एबी’ फॉर्म दिले. त्यामुळे पश्चिम उपनगरांतील उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत, वाजतगाजत मिरवणूक काढत आपले अर्ज भरले. तर, ऐन वेळी फॉर्म मिळाल्याने काहींची धावपळ उडाली. परिणामी निवडणूक कार्यालयांबाहेर गर्दी झाली होती.
वाहतूक कोंडीचा फटकामहापालिकेच्या विविध कार्यालयांबाहेर उमेदवारांसह कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास अनेक ठिकाणी रात्रीचे ८ वाजले होते. कार्यकर्त्यांच्या वाहनांमुळे कार्यालयाबाहेर कोंडी झाली होती.
भाजप : दहीसर प्रभाग क्र. ७ मधून मुंबई भाजप सरचिटणीस व माजी नगरसेवक गणेश खणकर, प्र. क्र. ८ मधून उत्तर मुंबई भाजप महामंत्री योगिता पाटील, बोरिवली प्र. क्र.९ मधून भाजप उमेदवार शिवानंद शेट्टी, बोरिवली प्र. क्र. १४ मधून भाजप उमेदवार ॲड. सीमा शिंदे, मालाड पश्चिम प्र. क्र. ४६ मधून भाजपच्या माजी नगरसेविका योगिता कोळी, प्र. क्र. ५८ मधून माजी नगरसेवक व माजी उपमहापौर दिलीप पटेल यांचे चिरंजीव संदीप पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिंदेसेना : दिंडोशी प्रभाग क्र. ४२ मधून माजी नगरसेविका धनश्री भरडकर, गोरेगाव प्रभाग क्र. ५१ मधून माजी नगरसेविका वर्षा टेंबवलकर, प्र. क्र. ६१ मधून माजी नगरसेविका राजुल पटेल, प्र. क्र. ६२ मधून माजी नगरसेवक राजू पेडणेकर, प्र. क्र. ७३ मधून उत्तर पश्चिम मुंबईचे खा. रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर-पोतनीस यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.
उद्धवसेना : पक्षाचे उपनेते व माजी आ. डॉ. विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव सौरभ घोसाळकर यांनी प्र. क्र. ७ मधून, गोरेगाव प्र. क्र. ५४ मधून नेते, आ. सुनील प्रभू यांचा मुलगा व युवा सेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, प्रभाग क्र. ७५ मधून, अंधेरी पूर्व विधानसभा संघटक व माजी नगरसेवक प्रमोद सावंत यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.
मनसे : प्रभाग क्र. ३८ सुरेखा परब, प्र. क्र. ५८ मधून मनसेचे गोरेगाव विभाग संघटक वीरेंद्र जाधव, प्र. क्र. ६७ मधून कुशल धुरी यांनी आपला अर्ज सादर केला.
राष्ट्रवादी (शरद पवार) : दिंडोशी प्र. क्र. ४३ येथून माजी नगरसेवक व पक्षाचे उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष अजित रावराणे, प्र. क्र. ५१ मधून आरती चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.
काँग्रेस : वर्सोवा प्र. क्र. ५९ मधून ज्येष्ठ मच्छीमार नेते रामदास संधे यांचे चिरंजीव जयेश संधे, प्र. क्र. ६५ मधून मुलगा सोफियान मोहसीन हैदर आणि ६६ मधून आई व माजी नगरसेविका मेहेर मोहसीन हैदर यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले.
Web Summary : Mumbai witnessed a flurry of activity on the last day for filing nominations. Parties distributed 'AB' forms, leading to processions and last-minute rushes. Traffic congestion was reported outside election offices as candidates filed papers.
Web Summary : मुंबई में नामांकन दाखिल करने के अंतिम दिन भारी गहमागहमी रही। पार्टियों ने 'एबी' फॉर्म वितरित किए, जिससे जुलूस और अंतिम समय में आपाधापी मची। उम्मीदवारों के कागजात दाखिल करने से चुनाव कार्यालयों के बाहर यातायात जाम रहा।