उमेदवारांची कोटींच्या कोटी उड्डाणो

By Admin | Updated: September 29, 2014 22:38 IST2014-09-29T22:38:27+5:302014-09-29T22:38:27+5:30

कर्जत विधानसभा मतदारसंघात सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत.

Candidates get crores of flights | उमेदवारांची कोटींच्या कोटी उड्डाणो

उमेदवारांची कोटींच्या कोटी उड्डाणो

>विजय मांडे - कर्जत
कर्जत विधानसभा मतदारसंघात सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. त्यात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये भाजपाचा उमेदवार वगळता अन्य सर्व उमेदवार करोडपती आहेत.   
विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी कर्जतमध्ये सर्व पक्ष सरसावले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, रिपाइं-आठवले गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदींसह काही अपक्ष उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार करोडपती आहेत. विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश नारायण लाड यांच्याकडे तसेच कुटुंबाकडे स्थावर आणि जंगम स्वरुपाची 18 कोटींची मालमत्ता आहे. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आणि शिवसेनेने उमेदवारी दिली नाही म्हणून पक्षाचा त्याग करणारे महेंद्र सदाशिव थोरवे यांच्याकडे स्थावर स्वरूपातील 2.38 कोटींची तर त्यांच्या पत्नीकडे 16 लाखांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे जंगम स्वरूपाची 8.52 कोटींची मालमत्ता आहे. त्यात पोसरी, बेंडसे, कडाव, टाकवे, गणोगाव येथील बारा हेक्टर जमीन आहे. पोसरी येथे बिनशेती जमीन देखील असून कर्जत शहरात वाणिज्य स्वरूपाची जागा आहे. त्यांच्याकडे असलेल्या अन्य मालमत्तेत दोन महागडय़ा गाडय़ा त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने साधारण दोन कोटी रुपयांची गुंतवणूक विविध बचत योजनांमध्ये केली आहे. थोरवे दांपत्य  चाळीस लाख इतका आयकर परतावा सरकारला भरत आहे, त्यांच्यावर सतरा लाखांचे कर्ज आहे. त्यांच्यावर दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास कर्जत पोलीस करीत आहे, तर गुन्ह्यात महेंद्र थोरवे यांच्यावर कर्जत न्यायालयाने दोषारोप ठेवले आहेत. 
 शिवसेनेचे उमेदवार आणि शिवउद्योग सेनेचे जिल्हाअध्यक्ष हनुमंत यशवंत पिंगळे हे देखील करोडपती उमेदवार आहेत. पिंगळे हे सरकारला 13 लाख आयकर परतावा भरत आहेत. त्यांची आणि कुटुंबीयांची जंगम मालमत्ता अडीच कोटींच्या आसपास आहे. हनुमंत पिंगळे यांची 4.76 कोटींची स्थावर मालमत्ता असून त्यापैकी 3.63 कोटींची मालमत्ता त्यांनी बनविली आहे. उषा हनुमंत पिंगळे यांची स्थावर मालमत्ता 2.27 कोटींची आहे. हनुमंत पिंगळे  यांनी श्रीक्षेत्न पंढरपूर आणि महड येथे जागा विकसित केली आहे. त्याची आजच्या बाजारभावाने किंमत 3.41 कोटी इतकी असून पत्नीच्या नावे ही किंमत 2.17 कोटी आहे. त्यांच्याकडे सर्वात महागडी गाडी असून मुलाकडे दोन महागडय़ा गाडय़ा आहेत. अन्य व्यावसायिक वाहने, त्यांचा बँकबॅलन्स, सोने, अन्य गुंतवणूक यांची किंमत दीड कोटी आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे शिवाजी बाबू खारिक यांच्याकडे जंगम आणि स्थावर स्वरूपाची 3.9क् कोटींची मालमत्ता आहे. रिपाइंचे उमेदवार मारुती गायकवाड हे देखील करोडपती असून स्थावर आणि जंगम स्वरूपाची अडीच कोटीची मालमत्ता आहे.
 
1 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जगन्नाथ पांडुरंग पाटील यांच्याकडे देखील करोडोची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे तीन वाहने असून विविध दहा गावांमध्ये त्यांनी जमिनी खरेदी केल्या असून त्यांची आजच्या बाजारभावाने किंमत साडेसात कोटी  आहे. स्थावर मालमत्ता त्यांची पन्नास लाखांची असून जागा विकसित करण्याचे काम सुरु  आहे. त्याची किंमत 9क् लाख असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 
 
2राष्ट्रीय काँग्रेसचे शिवाजी बाबू खारिक यांच्याकडे जंगम आणि स्थावर स्वरु पाची 3.9क् कोटीची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे दोन वाहने असून, मालमत्ता यांचा दोन लाखांचा परतावा करतात. रिपाइंचे उमेदवार मारु ती गायकवाड हे देखील करोडपती असून स्थावर आणि जंगम स्वरु पाची अडीच कोटीची मालमत्ता आहे.
 
3भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र येरूणकर व्यवसायाने वकील आहेत. त्यांची स्थावर आणि 
जंगम मालमत्ता 35.8क् लाख असून त्यांच्या पत्नीची मालमत्ता 21लाख आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार गोपाळ गुंजा शेळके हे देखील दोन कोटीचे मालक 
आहेत.

Web Title: Candidates get crores of flights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.