उमेदवारांची व्हॉट्सअॅप ग्रुपमधून ‘एक्झिट’
By Admin | Updated: April 26, 2015 00:01 IST2015-04-26T00:01:15+5:302015-04-26T00:01:15+5:30
महिन्याभरापूर्वी जोरदार चर्चेत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे व्हॉट्सअॅप ग्रुप आता अकार्यक्षम झाले आहेत.

उमेदवारांची व्हॉट्सअॅप ग्रुपमधून ‘एक्झिट’
नवी मुंबई : महिन्याभरापूर्वी जोरदार चर्चेत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे व्हॉट्सअॅप ग्रुप आता अकार्यक्षम झाले आहेत. खुद्द उमेदवारांनीही या ग्रुपमधून एक्झिट घेणेच पसंत केले. मतदानापूर्वी दिवसाला १० ते १२ मेसेज पाठवणाऱ्या ग्रुपमधून आता एकही मेसेज पाठवला जात नाही.
सर्वच सोशल मीडियाला उमेदवारांनी रामराम केले आहे. मतदारांच्या मतांच्या पाठिंब्याबद्दल विजयी उमेदवारांनी आभार न मानताच व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमधून काढता पाय घेतला आहे. काही उमेदवारांनी तर हा व्हॉट्सअॅप नंबरच निष्क्रिय केला आहे. मते हवी असताना सतत नागरिकांच्या संपर्कात राहणारे हे उमेदवार निवडून येताच नागरिकांशी संपर्क तोडतात, हे यातून स्पष्ट होते. आता मात्र या पाच वर्षांच्या कालावधीत नगरसेवक हा नुसताच नावापुरता राहणार की नागरिकांच्या समस्यांकडेही लक्ष देणार आहे हे येणारा काळच ठरवेल.