उमेदवाराकडून माजी शाखाप्रमुखाला मारहाण
By Admin | Updated: October 4, 2014 01:22 IST2014-10-04T01:22:16+5:302014-10-04T01:22:16+5:30
माहीम मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकत्र्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.

उमेदवाराकडून माजी शाखाप्रमुखाला मारहाण
>मुंबई : माहीम मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकत्र्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. सरवणकर आणि त्यांच्या कार्यकत्र्यानी माजी शाखाप्रमुख सिद्धार्थ चव्हाण यांना मारहाण केल्याने कट्टर शिवसैनिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने सरवणकर यांनी शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या इमारतीबाहेर तोडफोड केली होती. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. काँग्रेसच्या तिकीटावर लढूनही त्यांचा मनसेच्या उमेदवाराने दारुण पराभव केला होता.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर सरवणकर पुन्हा सेनेत दाखल
झाले. या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी पदरात पाडून सरवणकर यांनी प्रचाराला सुरुवात केली
आहे. त्यांचे कार्यकर्ते रविवारी प्रचारादरम्यान जाखादेवी मंदिराजवळील खेडगल्लीतील गणोशभुवन इमारतीत गेले होते. यावेळी रहिवाशांनी शिवसेनेच्या उमेदवाराला इमारतीमध्ये प्रचार करण्यास विरोध केला. याच इमारतीमध्ये माजी शाखा प्रमुख सिद्धार्थ चव्हाण राहत असल्याने त्यांच्या सांगण्यावरुनच कार्यकत्र्याना प्रचारापासून रोखल्याची समजूत झाल्याने सरवरणकर यांच्या कार्यकत्र्यानी चव्हाण यांना मारहाण केली. या प्रकाराने माहिम मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले आहेत.
या प्रकाराची चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरु असून विरोधकांनीही या प्रकाराचे भांडवल सुरु केले आहे. शिवसेनेतील कार्यकर्ते या प्रकाराने दुखावले असल्याने याचा फटका निवडणुकीत बसण्याची दाट शक्यता आहे. मारहाण प्रकरणाने कार्यकर्ते दुखावू नयेत आणि मतदारांमध्ये चांगली प्रतिमा रहावी यासाठी शिवसेनेने हे प्रकरण दडपले आहे. (प्रतिनिधी)
च्याबाबत सिद्धार्थ चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी दस:याच्या कार्यक्रमात व्यस्त असून असा कोणताच प्रकार झाला नसल्याचे त्यांनी सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तर घडलेल्या या प्रकाराबाबत सदा सरवणकर यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.