पालघरमधील आऊटसोर्सिंग भरती प्रक्रिया रद्द करावी

By Admin | Updated: December 26, 2014 23:01 IST2014-12-26T23:01:02+5:302014-12-26T23:01:02+5:30

पालघर जिल्ह्णाच्या निर्मितीनंतर सरकारी कार्यालयामध्ये होणारी नोकरी भरती आऊटसोर्सिग पद्धतीने होणार असल्याने सरकारी

Canceling the outsourcing recruitment process in Palghar | पालघरमधील आऊटसोर्सिंग भरती प्रक्रिया रद्द करावी

पालघरमधील आऊटसोर्सिंग भरती प्रक्रिया रद्द करावी

पालघर : पालघर जिल्ह्णाच्या निर्मितीनंतर सरकारी कार्यालयामध्ये होणारी नोकरी भरती आऊटसोर्सिग पद्धतीने होणार असल्याने सरकारी नोकरी मिळविण्याची तरूणांची आशा भंग पावणार आहे. ही भरती प्रक्रिया स्थगित करावी यासाठी मनसेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे व त्यांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांची भेट घेतली. यावेळी अशी भरती प्रक्रिया जि. प. मध्ये होणार असली तरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अशा भरती संदर्भात अजुन कुठलेही निर्देश मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्णाची १ आॅगस्ट रोजी घोषणा झाल्यानंतर जिल्हा प्रशासनात आस्थापनाची निर्मिती करून पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. मात्र ही पदे आऊटसोर्सिंग पद्धतीने भरण्यात येणार असल्याने स्थानिकांसह परराज्यातुन सरकारी नोकरीच्या आशेवर असलेल्या तरूणांची स्वप्ने मात्र भंग होणार आहेत. पालघर जिल्ह्णात नवीन ५६ कार्यालये सुरू होणार असून त्यासाठी टप्प्याटप्याने भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामध्ये जिल्हापरिषदेतील अ, ब, क ,ड स वर्गातील ३६ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. त्यातील क आणि ड वर्गातील पदे आऊटसोर्सिंग पद्धतीने भरली जाणार आहेत. यासंदर्भात मनसेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे भरण्यात येणाऱ्या १०२ पदासंदर्भात आऊटसोर्सिंग पद्धतीचाा अवलंब करण्याबाबत राज्यशासनाकडून कुठलेही निर्देश आले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Canceling the outsourcing recruitment process in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.