कॅनडाचा वर्क व्हिसा पडला महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:04 IST2020-12-08T04:04:44+5:302020-12-08T04:04:44+5:30
२९ हजारांची फसवणूक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कॅनडाचा वर्क व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली धोबी तलाव येथील ५४ वर्षीय ...

कॅनडाचा वर्क व्हिसा पडला महागात
२९ हजारांची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कॅनडाचा वर्क व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली धोबी तलाव येथील ५४ वर्षीय व्यक्तीची २९ हजार ५०० रुपयांना फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी रविवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात नवी दिल्लीतील ओॲसिस रिसोर्स मॅनेजमेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
धोबी तलाव येथील रहिवासी असलेले जितेंद्र कुमार असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. ते खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी फोनवरून संपर्क साधून कॅनडाच्या वर्क व्हिसासाठी मदत करण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. पुढे त्यांच्या सांगण्यावरून कुमार यांनी १२ ते १९ सप्टेंबरदरम्यान आराेपींच्या खात्यात २९ हजार ५०० रुपये ट्रान्सफर केले.
मात्र पैसे पाठवूनही काम न झाल्याने त्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. बरेच दिवस पाठपुरावा घेऊनदेखील संबंधित कर्मचाऱ्यांकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पाेलीस अधिक तपास करीत आहेत.
................................