‘पुरस्कार हस्तांतरित करता येत नाही’

By Admin | Updated: November 16, 2015 02:27 IST2015-11-16T02:27:21+5:302015-11-16T02:27:21+5:30

लेखक लेखनाच्या दुनियेत स्वत:ला समर्पित करतो, म्हणूनच पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. हा सन्मान अहस्तांतरित आहे. पुरस्कार कोणालाही हस्तांतरित करता येत नाही

'Can not transfer award' | ‘पुरस्कार हस्तांतरित करता येत नाही’

‘पुरस्कार हस्तांतरित करता येत नाही’

मुंबई : लेखक लेखनाच्या दुनियेत स्वत:ला समर्पित करतो, म्हणूनच पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. हा सन्मान अहस्तांतरित आहे. पुरस्कार कोणालाही हस्तांतरित करता येत नाही, असे
प्रतिपादन बालसाहित्य पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष विश्वनाथ तिवारी यांनी केले.
शनिवारी रविंद्र नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या या सोहळ््याला ज्येष्ठ साहित्यिक लीलाधर हेगडे यांना मराठीतील बाल साहित्यातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. मात्र, यावेळी हेगडे यांची प्रकृती अस्थीर असल्यामुळे त्यांच्या वतीने त्यांच्या पत्नी सुहासिनी हेगडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला, तर ‘सदू आनी जादूगर म्हादू’ या पुस्तकासाठी कोकणी लेख रामनाथ गावडे यांनाही बाल साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ गुजराती साहित्यिक चंद्रकांत शेठ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रौढ साहित्याचा पाया हा बालसाहित्यच आहे. साहित्याच्या अन्य प्रकारापेक्षा बाल साहित्याची निर्मिती करणे कठीण आहे. बाल साहित्याची उपेक्षा करणे बालकांची उपेक्षा करण्याप्रमाणे आहे. बाल साहित्याप्रती दायित्व देणे ही प्रत्येक साहित्यिकाची मुख्य जबाबदारी आहे, असे मत ज्येष्ठ गुजराती साहित्यिक चंद्रकांत शेठ यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी, एलि अहमद (आसामी), कार्तिक घोष (बंगाली), तिरेन बोडो (बोडो), ताराचंद्र कलंद्री (डोंगरी), सौम्या राजेंद्रन (इंग्रजी), निवेदिता सुब्रमण्यम (इंग्रजी), धिरुबेन पटेल (गुजराती), शेरजंग गर्ग (हिंदी), टी.एस. नागराज शेट्टी (कन्नड), नईम काश्मिरी (काश्मिरी), रामदेव झा (मैथिली), थोकचोम थोयड्बा मेतै (मणिपुरी), सेल्ला गणपती (तामिळ), चोक्कपू वेंकटरमण (तेलगू), बानो सरताज(उर्दू) आदी साहित्यिकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Can not transfer award'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.