आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी अभियान
By Admin | Updated: February 21, 2015 22:19 IST2015-02-21T22:19:26+5:302015-02-21T22:19:26+5:30
अपगे्रड करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालघर जिल्हा पत्रकार संघाने आयोजित वार्तालापात दिली.

आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी अभियान
$$्रिंपंकज राऊत ल्ल बोईसर
पालघर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये अनेक त्रुटी व नियोजन नसल्याने मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्ह्यातील ४६ आरोग्य केंद्रांचे इन्फ्रास्ट्रक्चरचे कायापालट अभियानांतर्गत अपगे्रड करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालघर जिल्हा पत्रकार संघाने आयोजित वार्तालापात दिली.
प्रत्येक आरोग्य केंद्रात डिलिव्हरी इक्विपमेंट्स चांगली ठेवण्यात येणार असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगली सेवा देता येईल तसेच आॅटो एन्लायझरद्वारे रक्ताचे नमुने तपासले जाणार असल्याने तेथे सीबीसीपासून रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचण्या घेण्यात येतील. बाहेर खाजगीत याच तपासणीकरिता रुग्णांना दोन ते अडीच हजार द्यावे लागतात. म्हणून आॅटो एन्लायझर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बसविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी देण्यात येणारी व्हिझिट इफेक्टीव होण्यासाठी दर महिन्याला रोख बक्षीस चिरंजीवी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर दाईचे प्रशिक्षणही सुरू करून त्यांना प्रशिक्षित करून त्यांना प्रोत्साहन देण्याचाही विचार सुरू असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगून ग्रामीण भागात आजही अंधश्रद्धा असून भगत आहेत, हे १०० टक्के सत्य आहे. त्यांचे लोक ऐकतात, हेही १०० टक्के सत्य आहे, म्हणून भगतांनाही तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्याची योजना असून ते एक मोठे आव्हान आहे.
परंतु, किमान किती लेव्हलपर्यंत पेशंट गेला तर त्या पेशंटला पुढे रेफर करा, असा प्रशिक्षणातून सल्ला देण्यात येणार आहे. होम डिलिव्हरीचा सर्व्हे केस टू केस करण्यात येणार असल्याने खरी वस्तुस्थिती समोर येईल.
गर्भवतीची नऊ महिन्यांत किमान एकदा तरी सोनोग्राफी झालीच पाहिजे, असे मत व्यक्त करून गर्भवतीचे वजन व एचबी मॉनिटरिंग आॅन रेकॉर्ड असले तरी ते बऱ्याच वेळा खोटे लिहिले जाते, त्याचीही तपासणी सुरू असून हायरिस्क असलेल्या गर्भवतींना स्त्रीरोगतज्ज्ञांद्वारे तपासण्याची योजना आहे. ज्या गावात थोडीशी सुशिक्षित स्त्री किंवा शिक्षिका असेल, त्यांना त्या-त्या गावांत आरोग्यमित्र म्हणून नेमण्यात येणार आहे.
दोन बाळंतपणातील अंतर कमी आहे. दरवर्षी बाळंतीण होणे, हीच मुख्य अडचण आहे. हे असेच सुरू राहिले तर माता व बालमृत्यू रोखता येणार नाही. परंतु, त्याकरिताही हेल्थ एज्युकेशन पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.
कुटुंब नियोजनासाठी प्रोत्साहित करण्यात येत असून सध्या पाच व अधिक वेळा बाळंतीण झालेल्या स्त्रियांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेवर भर देण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील एएनएसने सबस्टेशनला राहायलाच पाहिजे. जे राहत नाहीत, अशांवर दोन-तीन महिन्यांपासून कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ११८ ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोबाइल कनेक्टिव्हिटी नाही, त्या गावांतील आजारी पेशंटची माहिती पीएचसीपर्यंत पोहोचविण्यासाठी मानधन देऊन मोटारसायकल मेसेंजर संकल्पनेचे आयोजन करण्यात येणार आहे. वाडा, वसई, विक्रमगड येथील इस्कॉनच्या माध्यमातून गरोदर मातांना जेवण देण्यात येत असल्याने ज्या गावात गर्भवती असतील, त्यांना योग्य तो आहार मिळेल.
प्रथम चार ते पाच तालुक्यांत असा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवेत निश्चितपणे आमूलाग्र बदल होईल, असा विश्वास डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.