कॅडबरी जंक्शन होणार सुसाट!
By Admin | Updated: November 19, 2014 00:37 IST2014-11-19T00:37:55+5:302014-11-19T00:37:55+5:30
तीनहात नाक्यावरून स्टेशनकडे, रघुनाथनगर, मुुलुंड, मुंबई, नाशिक, घोडबंदर या मार्गावर दिवसाला सुमारे २५ हजारांच्या आसपास वाहनांची वर्दळ असते.

कॅडबरी जंक्शन होणार सुसाट!
अजित मांडके, ठाणे
तीनहात नाका, नितिन कंपनी आणि कॅडबरी जंक्शनच्या तीनही ठिकाणची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेने येथील तीनही सिग्नल काढून असून येथे ६०० कोटी खर्चून झीरो सिग्नल रोड योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी ‘यू’ आकाराचे ब्रीज तयार होणार असून रस्त्याच्या दुतर्फा असलेले अप आणि डाऊनचे चारही सर्व्हीस रोड हे अंडरपास होणार आहेत. यानुसार नितीन कंपनी नजिकच्या भुयारी मार्गानंतर आता तीनहात नाका आणि कॅडबरी जंक्शनखाली देखील भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे.
तीनहात नाक्यावरून स्टेशनकडे, रघुनाथनगर, मुुलुंड, मुंबई, नाशिक, घोडबंदर या मार्गावर दिवसाला सुमारे २५ हजारांच्या आसपास वाहनांची वर्दळ असते. तर नितिन कंपनीच्या ठिकाणी सध्या सिग्नल यंत्रणा नसल्याने तेथील ताण वाहतूक पोलिसांवर पडतो. कॅडबरी नाक्यावर देखील वाहतूककोंडी होतांना दिसते. सायंकाळी गर्दीच्या वेळेस येथे सिग्नल यंत्रणा बंद पडली तर वाहनचालकांना तासनतास खोळंबत राहावे लागते.