सिडकोकडून पाण्याचेही होणार आॅडिट

By Admin | Updated: January 10, 2015 01:45 IST2015-01-10T01:45:16+5:302015-01-10T01:45:16+5:30

नवीन पनवेल व खांदा वसाहतीतील सिडको इमारतींना मीटरप्रमाणे पाणी देण्यात येणार आहे. त्यानुसार मीटर बसविण्याच्या कामाला सुरु वात झाली

Cadakoke water to be audited | सिडकोकडून पाण्याचेही होणार आॅडिट

सिडकोकडून पाण्याचेही होणार आॅडिट

वैभव गायकर ल्ल नवी मुंबई
नवीन पनवेल व खांदा वसाहतीतील सिडको इमारतींना मीटरप्रमाणे पाणी देण्यात येणार आहे. त्यानुसार मीटर बसविण्याच्या कामाला सुरु वात झाली असून या योजनेमुळे पाण्याचा अपव्यय टळणार असून सिडकोचा महसूलही वाढणार आहे.
सिडकोने कळंबोलीसह नवीन पनवेल वसाहतीत सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधली आहेत. घरासंदर्भात सोडत काढून ३० ते ३५ वर्षापूर्वी सदनिकाधारकांना घरे दिली. नवीन पनवेल, खांदा वसाहतीत ए टाईप, पिएल ५, बी १०, पिएल ६, सी ५, एफ टाईप, ई वन, पिएल 5बी, पिएल ६ए , अशा प्रकारे एकूण बारा टाईपमध्ये ६१२ घरे आहेत. याठिकाणी प्राधीकरणाकडून रस्ते, ड्रेनेजबरोबर पाणी पुरवठाही केला जातो. गेल्या अनेक वर्षापासून या सदनिकाधारकांकडून ठराविक पाणीपट्टी घेतली जाते. दीडशे रु पयांपासून ते अडीचशे रु पये बिल प्रत्येक महिन्याला ठरविले असतानाही पाणी भरण्याबाबत कोणतीच मर्यादा नसल्याने अनेकवेळा इमारतीवरील पाणीसाठा करणारी टाकी भरून वाहते. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. राज्यात अनेक ठिकाणी पाण्याअभावी दुष्काळसदृश्य स्थिती असताना सिडको क्षेत्रात मात्र पाण्याचा गैरवापर होत आहे. सिडको महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी विकत घेऊन सिडको नोडमध्ये पुरविते, त्यामुळे सिडकोला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. या गोष्टी विचारात घेऊन सिडको मीटरप्रमाणे पाणी देणार आहे.
यासंबंधी सर्व खर्च सिडको करणार असून होणारा खर्च वसूल करण्यासंदर्भात सिडको धोरण ठरविणार आहे. काही ग्राहकांचा मीटर प्रमाणे वसुलीला विरोध आहे.

या योजनेमुळे पाण्याचा अपव्यय टाळता येणार असून पाण्याची बचत होणार आहे. खांदा कॉंलनी, नवीन पनवेल याठिकाणी या योजने प्रमाणे मीटर बसविण्याचे काम सध्या सुरु आहे. इतर नोडमध्येही अशाप्रकारची योजना राबविण्यासंदर्भात सिडको विचाराधीन आहे.
- मोहन निनावे, जनसंपर्क अधिकारी, सिडको

Web Title: Cadakoke water to be audited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.