Join us

सीएएला पाठिंबा नाहीच; एनआरसीसाठी मनसे आग्रही, राज ठाकरेंनी भूमिका केली स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 05:25 IST

मनसेच्या महाअधिवेशनात राज यांनी ९ फेब्रुवारीला घुसखोरांविरोधात मोर्चाची घोषणा केली.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ फेब्रुवारीचा मोर्चा हा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (सीएए) पाठिंबा देण्यासाठी नाही. सीएए आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) बाबत चर्चा होऊ शकते, मात्र समर्थन नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी याबाबतची भूमिका स्पष्ट केली.मनसेच्या महाअधिवेशनात राज यांनी ९ फेब्रुवारीला घुसखोरांविरोधात मोर्चाची घोषणा केली. त्यानंतर मनसेचा सीएए आणि एनआरसीला पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली. त्यातच मोर्चाच्या तयारीसाठी सोमवारी रंगशारदा सभागृहात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. घशाच्या त्रासामुळे राज यांना दहा मिनिटांतच रंगशारदावरून परतावे लागले. यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी बैठकीला संबोधित केले. या दोन्ही नेत्यांच्या उत्तराने पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नव्हते. त्यामुळे आज ‘कृष्णकुंज’वर बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज यांनी पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडल्याचे समजते.यासंदर्भात बाळा नांदगावकर म्हणाले की, भारतात अवैधरीत्या राहणाºया बांगलादेशी, पाकिस्तानी आणि इतर नागरिकांना भारतातून हाकलून लावा, अशी राज ठाकरे आणि मनसेची भूमिका आहे.ज्या भूमिका राष्ट्रहिताच्या...देशात आधीच १३५ कोटी लोक आहेत. त्यात आणखी लोकांना नागरिकत्व कशाला द्यायचे? देशात अवैधरीत्या राहणाºयांना हुसकावून लावण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतल्यास त्याला पाठिंबा असेल. ज्या भूमिका राष्ट्रहिताच्या आहेत, त्याला समर्थन असेल, असे नांदगावकर म्हणाले.

टॅग्स :राज ठाकरे