Join us

सीए परीक्षा १६ ते २४ मे; सुधारित वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 04:11 IST

आता या परीक्षा १६ मे ते २४ मेदरम्यान घेतल्या जाणार आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढे ढकललेल्या सीएपरीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता या परीक्षा १६ मे ते २४ मेदरम्यान घेतल्या जाणार आहेत. 

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाल्याने सीए फायनल आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यापूर्वी या परीक्षा ९ मे ते १४ मेदरम्यान घेतल्या जाणार होत्या. मात्र, युद्धजन्य स्थितीमुळे काही शहरांमध्ये परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे या परीक्षा स्थगित केल्या होत्या. मात्र, आता तणाव मावळल्यानंतर या परीक्षा घेण्याचा निर्णय आयसीएआयने घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रक आयसीएआयने काढले आहे. या परिपत्रकानुसार आता १६ ते २४ मेदरम्यान या परीक्षा घेतल्या जाणार असून, त्या पूर्वीच्याच केंद्रांवर आणि पूर्वीच्याच वेळेनुसार होणार आहेत. परीक्षेच्या वेळा आणि केंद्रे आधीप्रमाणेच राहणार आहेत. या परीक्षा दुपारी २ ते ५ आणि २ ते ६ या वेळेतच होतील. सीए फाउंडेशनच्या मे सत्रातील परीक्षांमध्ये मात्र कोणताही बदल केलेला नाही. या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, अशी माहिती आयसीएआयने दिली आहे

परीक्षा हाेणार अशा...

१६ मे - फायनल परीक्षा (ग्रुप २) पेपर ५ - इंडायरेक्ट टॅक्स लॉ/इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट (आयएनटीटी-एटी) पेपर १ - इंटरनॅशनल टॅक्स-ट्रान्सफर प्रायसिंग १८ मे - फायनल परीक्षा (ग्रुप दोन) पेपर ६ - इंटिग्रेटेड बिझनेस सोल्युशन्स/आयएनटीटी-एटी पेपर -२ - इंटरनॅशनल टॅक्स प्रॅक्टिस २० मे - इंटरमिजिएट परीक्षा (ग्रुप २) पेपर ४ - कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग २२ मे - इंटरमिजिएट परीक्षा (ग्रुप २) पेपर ५ - ऑडिटिंग अँड एथिक्स २४ मे - इंटरमिजिएट परीक्षा (ग्रुप २) पेपर ६ - फायनान्शियल मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट

सीए फाउंडेशनच्या परीक्षा १५, १७, १९ आणि २१ मे रोजी नियोजित वेळापत्रकानुसार घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारीनिशी   या परीक्षेला सामोरे जाता येईल, असे आयसीएआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

टॅग्स :सीएपरीक्षा