सी-लिंक ते ट्रान्स हार्बर थेट!
By Admin | Updated: November 27, 2014 22:51 IST2014-11-27T22:51:39+5:302014-11-27T22:51:39+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि शिवडी-वरळी कनेक्टर आता थेट वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडण्याबाबत विचारविनियम सुरू झाला आहे.

सी-लिंक ते ट्रान्स हार्बर थेट!
सचिन लुंगसे ल्ल मुंबई
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि शिवडी-वरळी कनेक्टर आता थेट वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडण्याबाबत विचारविनियम सुरू झाला आहे. हे तिन्ही मार्ग जुळल्यास प्रवाशांचा प्रवासातील निम्मा वेळ तर वाचेलच पण मुंबई अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे.
वांद्रे-वरळी सी-लिंक यापूर्वीपासूनच मुंबईकरांच्या वापरात असून, मुंबई शहरातील ईस्ट-वेस्टला जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पावले उचलली आहेत. एमएमआरडीएच्या सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि शिवडी-वरळी कनेक्टर असे दोन प्रकल्प प्राधिकरणाच्या वतीने यापूर्वीच आखण्यात आले आहेत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे प्रवाशांना शिवडीहून थेट न्हावा-शेवा गाठता येणार आहे. आणि शिवडी-वरळी कनेक्टरमुळे प्रवाशांना मुंबईच्या ईस्टहून थेट वेस्टकडे म्हणजे वरळीकडे येता येणार आहे. या दोन मार्गाचे अंतर कापल्यानंतर प्रवाशांना विनाअडथळा थेट वरळीहून वांद्रे गाठता यावे, म्हणून ट्रान्स हार्बर, शिवडी-वरळी कनेक्टर आणि सी-लिंक जोडण्यावर प्राधिकरण भर देणार आहे.
सी-लिंक, ट्रान्स हार्बर आणि शिवडी-वरळी कनेक्टर हा प्रकल्प एमएमआरडीएच पूर्ण करणार असून, महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाला याबाबत सुधारित प्रस्तावदेखील एमएमआरडीएच्या वतीने सादर करण्यात येणार आहे. शिवाय या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प हा शिवडी आणि न्हावा-शेवाला जोडणार आहे. मात्र शिवडी येथे ट्रान्स हार्बरचा फटका स्थलांतरित पक्षी फ्लेमिंगोंना बसेल, अशी भीती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने वर्तविली आहे. स्थलांतरित फ्लेमिंगोंसह येथील पक्ष्यांच्या अंदाजे 15क् प्रजातींना ट्रान्स हार्बरचा फटका बसू नये म्हणून शिवडीपासून दक्षिणोकडे खाली 5क्क् मीटर अंतरावर हा प्रकल्प सरकवण्यात यावा, अशा आशयाचा प्रस्ताव बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला सादर करण्यात आला आहे. मात्र एमएमआरडीएकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद आला नसल्याची खंत सोसायटीने व्यक्त केली आहे.
4या संपूर्ण प्रकल्पामुळे मुंबई ईस्ट-वेस्ट अशी जोडली जाणार आहे.
4मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा दररोज 6क् हजार वाहने वापर करतील.
46क् हजार वाहनांपैकी 1क् ते 15 हजार वाहने शिवडी-वरळी कनेक्टरचा वापर करतील.
4नवी मुंबईहून वांद्रे गाठायचे झाल्यास दोन तासांहून अधिक कालावधी लागतो.
4जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल, तेव्हा हे अंतर अवघ्या 45 मिनिटांत कापता येईल.