भायखळा-भारतमाता उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद
By Admin | Updated: November 10, 2016 11:05 IST2016-11-10T00:34:31+5:302016-11-10T11:05:00+5:30
भारतमाता चित्रपटगृहापासून भायखळ््यातील राणीबागेसमोर उतरणारा उड्डाणपूल बुधवारी रात्री वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

भायखळा-भारतमाता उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - भारतमाता चित्रपटगृहापासून भायखळ्यातील राणीबागेसमोर उतरणारा उड्डाणपूल बुधवारी रात्री वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाची लोखंडी पट्टी निसटल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आली.
यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी सांगितले की, उड्डाणपुलाची जबाबदारी एमएमआरडीए प्रशासनाकडे आहे. या घटनेची माहिती प्रशासनाला दिली असून रात्री उशीरा एमएमआरडीचे अभियंते पाहणीसाठी येणार आहेत. सकाळपर्यंत दुरूस्ती झाल्यास उड्डाणणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
याउलट प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाच्या जयहिंद मुक्ता चित्रपटगृहासमोरील खांब्याला तडा गेला आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वाहतूक कोंडी
लालबाग उड्डाणपुलावरील वाहतूक बंद असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या उड्डाणपूलाला तडा गेल्याने रात्रीपासून दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुरुस्तीसाठी उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
फोटो - चेतन ननावरे