बोगस नोटा देऊन भाजी खरेदी
By Admin | Updated: February 16, 2017 02:35 IST2017-02-16T02:35:43+5:302017-02-16T02:35:43+5:30
भाजीविक्रेत्याला बोगस नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या तिघांना बुधवारी गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे.

बोगस नोटा देऊन भाजी खरेदी
मुंबई : भाजीविक्रेत्याला बोगस नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या तिघांना बुधवारी गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे. राजू जाधव, विजू जाधव आणि एन. अचरेकर अशी या आरोपींची नावे आहेत. दारू पिण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
चेंबूरच्या डायमंड उद्यान परिसरात ही घटना बुधवारी घडली आहे. नाशिक येथून काही भाजीविक्रेते रोज या परिसरात भाजी विक्रीसाठी येत असतात. दरम्यान, आजदेखील परिसरात भाजीविक्री करत असताना, या आरोपींनी एका भाजी विक्रेत्याकडून भाजी विकत घेतली. त्यानंतर, सुटे पैसे घेऊन आरोपी निघण्याच्या तयारीत असताना, भाजीविक्रेत्याला नोटांबद्दल संशय आला. त्याने तत्काळ आरडाओरडा केल्याने यातील एका आरोपीला रहिवाशांनी पकडून गोवंडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, या आरोपीला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)