Join us

पसंतीच्या नावासमोर दाबले बटण; मुंबईत ‘नोटा’ झाला छोटा! २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 11:42 IST

२०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीमध्ये ‘नोटा’चा टक्का घटला आहे. गेल्या निवडणुकीत एक लाख ४२ हजार ५०२ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला होता.

मुंबई :

२०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीमध्ये ‘नोटा’चा टक्का घटला आहे. गेल्या निवडणुकीत एक लाख ४२ हजार ५०२ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला होता. तर, यंदाच्या निवडणुकीमध्ये ७३ हजार ४५४ मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबले आहे. यावेळी अणुशक्ती नगर, मुलुंड आणि बोरीवली या तीन मतदारसंघांतील मतदारांनी तीन हजारांहून अधिक मते ‘नोटा’ला दिली आहेत. तर, गेल्या निवडणुकीत जोगेश्वरीत १२ हजार ०३१ आणि बोरीवलीतील १० हजार ०९५ इतक्या मतदारांनी ‘नोटा’ला मत दिले होते.... यासाठीच पर्याय- निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी कोणताही उमेदवार आवडत नसेल, त्यांना मत द्यायचे नसेल, तर त्यासाठी निवडणूक आयोगाने ‘नोटा’ पर्यायाची व्यवस्था केली आहे.- ‘नोटा’चे बटण दाबणे याचा अर्थ निवडणूक लढविणारा एकही उमेदवार तुमच्या मते योग्य नाही, असा आहे.- भारतीय निवडणूक आयोगाने इतर राज्यांत डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये ‘नोटा’चा पर्याय मतदारांना उपलब्ध करून दिला होता.

२०१९ मध्ये जोगेश्वरीला सर्वाधिक ‘नोटा’जोगेश्वरी- १२,०३१बोरीवली- १०,०९५वरळी- ६,३०५ 

२०२४ मध्ये ७३,४५४ जणांनी दाबले ‘नोटा’ बटणमतदारसंघ    नोटाअणुशक्ती नगर    ३,८८४मुलुंड    ३,८३४ बोरीवली    ३,६३७ 

२०२४ मध्ये तिसऱ्या क्रमांकांची ‘नोटा’ मते घेणारे मतदारसंघ मुलुंड- ३,८३४अंधेरी पूर्व- २,३४६मलबार हिल- २,०१५अंधेरी पश्चिम- १,८२२वांद्रे पश्चिम- १,६७८मालाड पश्चिम- १,५०८कुलाबा- १,९९३मुंबादेवी- १,११३ 

टॅग्स :मुंबई