विमानात पॉर्न क्लिप पाहणा-या बिझनेसमनला अटक

By Admin | Updated: February 15, 2017 18:37 IST2017-02-15T16:00:50+5:302017-02-15T18:37:32+5:30

विमानामध्ये बसून पॉर्न क्लिप्स पाहणा-या 43 वर्षीय बिझनेसमनला विमानतळ पोलिसांनी अटक केली.

The businessman caught watching a porn clip on the plane | विमानात पॉर्न क्लिप पाहणा-या बिझनेसमनला अटक

विमानात पॉर्न क्लिप पाहणा-या बिझनेसमनला अटक

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 15 - विमानामध्ये बसून पॉर्न क्लिप्स पाहणा-या 43 वर्षीय बिझनेसमनला विमानतळ पोलिसांनी अटक केली. इंडिगोच्या कोलकाताहून मुंबईला येणा-या विमानात शनिवारी सकाळी ही घडली. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार हवाई सुंदरी आणि तिच्या सुपरवायझरने या बिझनेसमनला पॉर्न क्लिप पाहताना पकडले. त्यांनी तात्काळ विमानतळ पोलिसांना माहिती दिली. 
 
आरोपी विरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक होण्यापूर्वी या बिझनेसमनने सर्व क्लिप्स डिलीट केल्या. त्यामुळे त्याच्या विरोधात पुराव्यांशी छेडछाड केल्याचाही आरोप आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, डिलीट केलेले व्हिडीओ परत मिळवण्यासाठी मोबाइल एफएसएल लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.  
 
तक्रार नोंदवणा-या 26 वर्षीय एअरहोस्टेसने आरोपीला दोनवेळा पॉर्न क्लिप पाहताना पाहिले. आरोपीने दोन्ही वेळा मोबाईलची स्क्रीन
मला दाखवण्याचा प्रयत्न केला असे तिने म्हटले आहे. हवाईसुंदरीने तात्काळ सुपरवायझरच्या कानावर ही गोष्ट घातली. सुपरवायझरनेही आरोपीला क्लिप पाहताना पाहिले. तिने तात्काळ वैमानिकाला माहिती दिली. त्याने पोलिसांना सांगितले. 
 

Web Title: The businessman caught watching a porn clip on the plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.