शिक्षणाच्या बाजारात ‘गुणांचा धंदा’
By Admin | Updated: June 24, 2015 04:56 IST2015-06-24T04:56:55+5:302015-06-24T04:56:55+5:30
डॉक्टर, इंजिनीअर होण्याचे स्वप्न पाहात बारावीत आणि पूर्वपरीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी दिवस-रात्र एक करीत पुस्तकांची घोकंपट्टी करणारे विद्यार्थी.

शिक्षणाच्या बाजारात ‘गुणांचा धंदा’
मुंबई : डॉक्टर, इंजिनीअर होण्याचे स्वप्न पाहात बारावीत आणि पूर्वपरीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी दिवस-रात्र एक करीत पुस्तकांची घोकंपट्टी करणारे विद्यार्थी... आपल्या पाल्याला कशाचीही कमतरता भासू नये म्हणून पै-पै जमवून फी भरणारे आणि त्यासाठी जिवाचे रान करणारे पालक... अशा आशा, अपेक्षा आणि स्वप्नांचे भांडवल करण्याचा बाजार सध्या अनेक क्लासेसने सुरू केला आहे. अकरावी प्रवेशासाठी बोरीवली येथील रेझोनन्स, सिनॅप्स आणि मालाडमधील सिन्हाल क्लासेस गुणांचे आमिष दाखवून पालकांकडून लाखो रुपयांची लूट सुरू असल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली. त्याची शहानिशा करण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी पालक म्हणून या क्लासेसला भेट दिली. शिवाय संबंधित क्लासेस दावा करत असलेल्या कांदिवलीच्या समता विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, निर्मला कॉलेज आॅफ कॉमर्स अॅन्ड सायन्स, डी.आर. व्यास कनिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयांचीही झाडाझडती घेत स्टिंग आॅपरेशन केले. या सर्व वार्तांकनाचा पुरावा ‘लोकमत’ प्रतिनिधींकडे आहे. या स्टिंगमधून पालकांच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालणारे हे ढळढळीत वास्तव...