व्यावसायिक हबवर ‘बेस्ट’ नजर
By Admin | Updated: November 9, 2014 00:59 IST2014-11-09T00:59:28+5:302014-11-09T00:59:28+5:30
एकीकडे मेट्रोच्या स्पर्धेत बसफेरीची धाव कमी पडल्यामुळे ही सेवाच गुंडाळण्यात येत असताना बेस्ट उपक्रम आता उपनगरातील व्यावसायिक हबकडे वळला आह़े

व्यावसायिक हबवर ‘बेस्ट’ नजर
मुंबई : एकीकडे मेट्रोच्या स्पर्धेत बसफेरीची धाव कमी पडल्यामुळे ही सेवाच गुंडाळण्यात येत असताना बेस्ट उपक्रम आता उपनगरातील व्यावसायिक हबकडे वळला आह़े वांद्रे-कुर्ला संकुलात अनेक कार्यालये असल्याने तेथील प्रवाशांसाठी 5क् बससेवा सुरू करण्याचा बेस्टचा विचार सुरू आह़े
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत 45क् नवीन बसगाडय़ा बेस्टमार्फत खरेदी केल्या जाणार आहेत़ आयुर्मानाप्रमाणो 3क्क् बसगाडय़ा भंगारात काढण्यात आल्यानंतर नवीन बस घेण्यात येणार आहेत़ या जादा बसगाडय़ा वांद्रे-कुर्ला संकुलात फिडर म्हणजे कमी छोटय़ा अंतरावर धावणार आहेत़ जेणोकरून वांद्रे आणि कुर्ला स्थानकाला जाण्यासाठी प्रवासी या बसगाडय़ांचा पर्याय अवलंबतील़
भविष्यातील नवीन बसमार्गासाठी शंभर बसगाडय़ांचा ताफा राखून ठेवण्यात येणार आह़े स्वतंत्र मार्गिका म्हणजेच बीआरटीएस भविष्यात अमलात आल्यास जास्तीत जास्त प्रवाशांना बेस्टकडे वळविण्यासाठी द्रुतगती महामार्ग आणि जोड रस्त्यांवरील जादा बस सेवा सुरू करण्याचाही प्रयत्न असेल, असे वाहतूक खात्यातील एका अधिका:याने सांगितल़े (प्रतिनिधी)
नवीन बस ठरणार आरामदायी
बेस्टच्या ताफ्यात दाखल होणा:या विनावातानुकूलित 45क् बसगाडय़ा प्रवाशांसाठी आरामदायी ठरतील, अशी हमी बेस्ट प्रशासन देत आह़े आरामदायी आसन, पाय ठेवण्यासाठी पुरेशी जागा आणि मजबूत बसगाडी असणार आह़े प्रत्येकी 45 लाख रुपये या बसगाडय़ांची किंमत असेल़
जुन्या बसगाडय़ा भंगारात
आयुर्मान संपुष्टात येत असलेल्या 119 बसगाडय़ा भंगारात काढण्यात येत आहेत़ त्यानंतर 18क् बसगाडय़ा मार्च 2क्15 र्पयत भंगारात काढण्यात येणार आहेत़
बसगाडय़ा बंद पडण्याच्या संख्येत घट
जुन्या व आयुर्मान संपलेल्या बसगाडय़ांची व्यवस्थित दुरुस्ती होत नसल्यामुळे रस्त्यातच या गाडय़ा बंद पडण्याच्या घटना वाढल्या होत्या़ यामुळे वाहतुकीची कोंडी व प्रवाशांचे हाल होत असत़ मात्र आतार्पयत दरमहा 12क् ते 14क् बसगाडय़ा बंद पडत होत्या़ या संख्येत घट होऊन आता 9क् बसगाडय़ा बंद पडतात़