बस-जीपचा अपघात; दोन ठार
By Admin | Updated: January 2, 2015 22:45 IST2015-01-02T22:45:41+5:302015-01-02T22:45:41+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव आरामबसची समोरून येणाऱ्या तवेरा जीपला जोरदार ठोकर लागून झालेल्या अपघातात जीपमधील दोघा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला

बस-जीपचा अपघात; दोन ठार
महाड : मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव आरामबसची समोरून येणाऱ्या तवेरा जीपला जोरदार ठोकर लागून झालेल्या अपघातात जीपमधील दोघा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. ुपहाटे २.३० वा. च्या सुमारास महाड शहरालगतच्या गांधारपाले गावच्या हद्दीत हा अपघात घडला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक एक तास थांबविण्यात आलेली होती.
जीपमधील प्रवासी डहाणू व तलासरी तालुक्यातील रहिवासी असून ते रत्नागिरीकडे जात असताना गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या आरामबसने त्यांना ठोकले. या अपघातात पिंटू पासारी (२०, रा. वंकास गोवरशेत पाडा, ता. डहाणू) व धाकट करबट (३५, रा. गोवरशेत पाडा) हे दोघे जागीच ठार झाले, तर अरविंद वणगा (२०), रुपेश तुंबडा (४८), व निकसनप वागड जीपचालक (२९) हे गंभीर जखमी झाले आहे. (वार्ताहर)