मैत्रिणींच्या चिडवण्याला कंटाळून पेटवून घेतले

By Admin | Updated: February 6, 2015 02:39 IST2015-02-06T02:39:40+5:302015-02-06T02:39:40+5:30

वर्गमैत्रिणींच्या चिडवाचिडवीला कंटाळून एका १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने गुरुवारी संध्याकाळी ५च्या सुमारास आपल्या राहत्या घरी पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला

Burned the girlfriends's throat | मैत्रिणींच्या चिडवण्याला कंटाळून पेटवून घेतले

मैत्रिणींच्या चिडवण्याला कंटाळून पेटवून घेतले

भांडुपमधील घटना : विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : वर्गमैत्रिणींच्या चिडवाचिडवीला कंटाळून एका १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने गुरुवारी संध्याकाळी ५च्या सुमारास आपल्या राहत्या घरी पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना भांडुप पश्चिमेकडील काजुटेकडी परिसरात घडली. या घटनेत ती सुमारे ४५ टक्के भाजली असून, शेजाऱ्यांनी तिला उपचारार्थ सायन रुग्णालयात दाखल केले आहे.
भांडुप पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून, पुढील कारवाई सुरू केली आहे. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रगती डीके (१३) असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती काजुटेकडी येथील सूर्यवंशी चाळीत आई-वडील व मोठ्या बहिणीसोबत राहाते. पराग शाळेत शिकणारी प्रगती गेल्या दोन दिवसांपासून तणावग्रस्त होती. वर्गातल्या मैत्रिणी चिडवतात, अशी तक्रार तिने आई-वडिलांकडे केली होती.
तू चांगली मुलगी नाहीस असे म्हणून मैत्रिणी तिला हिणवत होत्या. त्यामुळे निराश झालेल्या प्रगतीने संध्याकाळी ५च्या सुमारास घरात एकाकी असताना अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. मात्र चटके बसू लागताच तिने आरडाओरडा सुरू केला. शेजारी घराबाहेर गोळा झाले. मात्र प्रगतीने घर आतून बंद केल्याने शेजाऱ्यांना दरवाजा तोडून मदतीसाठी आत शिरावे लागले. तितक्या वेळेत प्रगती सुमारे ४५ टक्के भाजली. त्यानंतर मात्र शेजाऱ्यांनी तत्काळ तिला उपचारार्थ सायन रुग्णालयात दाखल केले. भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रगतीच्या पालकांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. प्रगतीवर उपचार सुरू असल्याने तिचा जबाब नंतर नोंदविण्यात येईल, असे समजते. पुढील चौकशी सुरू आहे. प्रगतीचे आईवडील मजुरी करतात. (प्रतिनिधी)

विवस्त्र करून मारहाण
लातूर : गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायत आणि गावगुंडांशी लोकशाही मार्गाने लढा देत अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या बोरगावच्या (ता. चाकूर) ‘रणरागिणी’ला काय बक्षीस मिळाले, तर भर चौकात गावगुंडाकडून विवस्त्र करुन मार खाण्याचे ! पाच - सहा महिलांसह पाच-पंचवीस गावगुंड आणि या टोळीचा म्होरक्या खुद्द गावचा सरपंच. ती रडली, ओरडली, परंतु गावगुंडांचा राग ‘आमच्याविरुद्ध उपोषण करते का ?’ चा जाब विचारत विवस्त्र करुन धिंड काढूनच शमला. 

Web Title: Burned the girlfriends's throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.