सानपाडा येथे घरफोडी

By Admin | Updated: May 27, 2014 00:28 IST2014-05-27T00:28:16+5:302014-05-27T00:28:16+5:30

सानपाडा येथे बंद घरात घरफोडीची घटना घडली आहे. त्यामध्ये घरातील १ लाख ३० हजार रुपये किमतीचा एवज चोरीला गेला आहे

Burglary at Sanpada | सानपाडा येथे घरफोडी

सानपाडा येथे घरफोडी

नवी मुंबई : सानपाडा येथे बंद घरात घरफोडीची घटना घडली आहे. त्यामध्ये घरातील १ लाख ३० हजार रुपये किमतीचा एवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सानपाडा सेक्टर १० येथे राहणार्‍या मुग्धा पाटील यांच्या घरी ही घरफोडी झाली आहे. शनिवारी यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने हा प्रकार केला. बंद घराच्या बाथरुमच्या खिडकीची काच फोडून चोरट्याने आत प्रवेश मिळवला. त्यानंतर घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा १ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. रविवारी पाटील यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानुसार तुर्भे पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Burglary at Sanpada