दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या

By Admin | Updated: December 5, 2014 00:13 IST2014-12-05T00:13:50+5:302014-12-05T00:13:50+5:30

माणगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० नोव्हेंबर रोजी

Burglar at two different locations | दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या

दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या

गोरेगाव : माणगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुधीर दत्तू पाशिलकर, रा. सिद्धी हॉटेलशेजारी निजामपूर ते आपले घर बंद करुन बैठकीसाठी गेले होते. त्यावेळी घराच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करुन घरातील १ लाख १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. पाशिलकर घरी आल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी माणगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
माणगांव तालुक्यात अनंत रामकृष्ण उपाध्ये रा. ओंकार अपार्टमेंट ब्लॉक नं. १०४, कचेरी रोड माणगांव यांच्या तक्रारीनुसार, दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटाच्या लॉकरमधील १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पळून गेले. याबाबत माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून माणगाव, महाड, नागोठणे परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून त्याचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)

Web Title: Burglar at two different locations