तुर्भे गावात घरफोडी
By Admin | Updated: November 8, 2014 00:50 IST2014-11-08T00:50:25+5:302014-11-08T00:50:25+5:30
तुर्भे गावात गुरुवारी संध्याकाळी घरफोडी झाली. या प्रकारात घरातील सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे

तुर्भे गावात घरफोडी
नवी मुंबई : तुर्भे गावात गुरुवारी संध्याकाळी घरफोडी झाली. या प्रकारात घरातील सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. अवघ्या दोन तासांच्या अवधीत हा प्रकार घडला असून, या ठिकाणी रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तुर्भे गावातील शिवशाही इमारतीमध्ये ही घटना घडली. रमणलाल काशिनाथ यांचे भाऊ त्या ठिकाणी राहतात. गुरुवारी संध्याकाळी दोन तासांकरिता त्यांचे घर बंद असताना तेथे घरफोडी झाली. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ६२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, संध्याकाळच्या वेळी ही घटना घडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. (प्रतिनिधी)