बंटी पांडेला जन्मठेप

By Admin | Updated: December 13, 2014 02:15 IST2014-12-13T02:15:43+5:302014-12-13T02:15:43+5:30

प्रकाश ऊर्फ बंटी पांडेला सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा व 31 लाख रुपयांचा दंड ठोठावला़ खून व खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली़

Bunty Pandey's life imprisonment | बंटी पांडेला जन्मठेप

बंटी पांडेला जन्मठेप

मुंबई :  गँगस्टर छोटाचा राजनचा साथीदार प्रकाश ऊर्फ बंटी पांडेला सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा व 31 लाख रुपयांचा दंड ठोठावला़ खून व खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली़
दक्षिण मुंबईतील एका हॉटेलच्या सुरक्षारक्षकावर पांडेने गोळीबार केला होता व त्यात त्याचा बळी गेला़ त्यानंतर या हॉटेलच्या मालकाकडे पांडेने पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितली़  12 लाख रुपयांवर याची तडजोड झाली़ याप्रकरणी पांडेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने सात साक्षीदार तपासल़े त्यात गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने पांडेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावल़े  एकूण 31 लाख रुपयांच्या दंडातील पाच लाख रुपये सुरक्षारक्षकाच्या कुटुंबाला देण्याचे व हॉटेलमालकाला 12 लाख रुपये परत करण्याचे निर्देश न्यायालयाने पांडेला दिल़े (प्रतिनिधी)

 

Web Title: Bunty Pandey's life imprisonment