एमआयडीसीमध्येदुकानात घरफोडी

By Admin | Updated: June 12, 2014 02:33 IST2014-06-12T02:33:53+5:302014-06-12T02:33:53+5:30

रबाळे एमआयडीसी येथील इलेक्ट्रीकल अँड हार्डवेअर दुकानात घरफोडीची घटना घडली आहे.

Bunker in the milkhouse in MIDC | एमआयडीसीमध्येदुकानात घरफोडी

एमआयडीसीमध्येदुकानात घरफोडी

नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी येथील इलेक्ट्रीकल अँड हार्डवेअर दुकानात घरफोडीची घटना घडली आहे. सोमवारी रात्री हे दुकान बंद असताना कुलूप तोडून अज्ञात व्यक्तींनी आत प्रवेश मिळवला. त्यानुसार दुकानातील विविध प्रकारचा सुमारे २९ हजार रुपये किमतीचा माल चोरुन नेला.
याप्रकरणी दुकानाचे मालक किशोर चौधरी यांनी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार केली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bunker in the milkhouse in MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.