आगाशी रोडवरील इमारत कोसळली

By Admin | Updated: March 31, 2015 22:38 IST2015-03-31T22:38:24+5:302015-03-31T22:38:24+5:30

विरार पश्चिम आगाशी रोडवर एव्हरेडी इमारतीचा भाग कोसळला. सोमवारी दुकाने बंद असल्यामुळे जीवितहानी मात्र झाली नाही.

The building on Agas Road collapsed | आगाशी रोडवरील इमारत कोसळली

आगाशी रोडवरील इमारत कोसळली

पारोळ : विरार पश्चिम आगाशी रोडवर एव्हरेडी इमारतीचा भाग कोसळला. सोमवारी दुकाने बंद असल्यामुळे जीवितहानी मात्र झाली नाही. ही इमारत ४० वर्षापेक्षा जुनी असल्याचे सुत्राकडून समजते.
या इमारतीमध्ये व्यापारी गाळे असून प्लायवुड, मोबाईल, किराणा अशा वस्तूंची दुकाने आहेत व ही इमारत या भागातील व्यापारी दृष्टीने महत्वाची असून या ठिकाणी गिऱ्हाइकांची नेहमी वर्दळ असते. पण सोमवार म्हणजे येथील व्यापाऱ्यांची सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे सर्व व्यापारी गाळे बंद होते. त्यामुळे इमारतीचा भाग कोसळला तरी जीवितहानी मात्र झाली नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी त्वरीत धाव घेवून परिस्थिती हाताळून इमारतीतील रहिवाशांना धोकादायक भागापासून बाजूला केले. (वार्ताहर)

Web Title: The building on Agas Road collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.