बिल्डर व्योमेश शहा रात्रभर खारघर पोलीस कोठडीत

By Admin | Updated: February 10, 2016 00:55 IST2016-02-10T00:55:35+5:302016-02-10T00:55:35+5:30

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यात अडकलेल्या व्योमेश शहासह अन्य तिघांना सीआयडीने सोमवारी अटक केली.

The builder Vyomesh Shah spent the night in Kharghar police custody | बिल्डर व्योमेश शहा रात्रभर खारघर पोलीस कोठडीत

बिल्डर व्योमेश शहा रात्रभर खारघर पोलीस कोठडीत

पनवेल : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यात अडकलेल्या व्योमेश शहासह अन्य तिघांना सीआयडीने सोमवारी अटक केली. या सर्वांना खारघर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी ९ वाजता त्यांना मुंबई न्यायालयात नेण्यात आले.
मुंबईतील बिल्डर व्योमेश शहा यांच्यासह विलास भांडारकर, तसेच कोमराल कंपनीचा माजी संचालक किरण कॉन्ट्रॅक्टर व विद्यमान संचालक सुहास डुंबरे यांची सोमवारी सीआयडीच्या कार्यालयात सहा तास चौकशी केल्यानंतर त्यांना गजाआड केले. चौकशीनंतर सोमवारी रात्री अकराच्या सुमारास खारघर पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते. सीआयडीचे अधिकारी त्यांना सकाळी ९ च्या सुमारास खारघर पोलीस ठाण्यावरून मुंबई न्यायालयात घेऊन गेले. (प्रतिनिधी)

Web Title: The builder Vyomesh Shah spent the night in Kharghar police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.